जत,प्रतिनिधी : श्री.उमाजीराव सनमडीकर मेडीकल फौडेशन जत, संचलित सिध्दार्थ पब्लिक स्कूल या सी.बी.एस.ई स्कूलचे विद्यार्थांनी डॉ.होमीभाभा बालवैज्ञानिक स्पर्धात्मक परीक्षा मुंबई यांच्यामार्फत नुकत्याच घेण्यात आलेल्या परीक्षेत उज्वल यश संपादन केले.त्यात इयत्ता 6 वीचे 17 तर 9 वीचे 13 विद्यार्थी उत्तीर्ण झाले.ही परीक्षा दिनांक 5 ऑक्टोबरला घेण्यात आली होती. इयत्ता 6 वीचा विद्यार्थी आयुष धनाजी टोणे हा पुढील प्रात्यक्षिक परीक्षेसाठी पात्र ठरला आहे.यशस्वी विद्यार्थ्याचे संस्थेचे चेअरमन माजी आमदार उमाजीराव सनमडीकर यांनी कौतुक केले.स्कूलचे प्राचार्य डॉ.विल्सन थॉमस,मार्गदर्शक शिक्षिका-सौ.सविता पाटील,मंजुश्री कोरे,आस्मा शेख,मोहीनी म्हेत्रे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.विद्यार्थ्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.