करजगी(कल्लणा बालगाव): करजगी ता.जत येथील इतिसकालीन संदर्भ असलेल्या जीन्नेसाहेब दर्ग्याचा ऊरूस सालाबादप्रमाणे आजपासून सुरू होत आहे.आज मगंळवार गंध लेपन व धार्मिक विधी,बुधवारी नेवैद्य व धार्मिक कार्यक्रम,गुरूवार मुख्य दिवस संध्याकाळी जंगी कुस्त्या,दगड उचलणे आदी स्पर्धा,रात्री आठ वाजता पालखी मिरवणूक, करमणूकीचा कार्यक्रम महाप्रसाद असे कार्यक्रम आयोजित केले आहेत.जत तालुक्यातील या दर्ग्याची इतिहासात नोंद असलेली ऐतिहासिक माहिती अशी, बगदादचे सूफी संत हजरत जून्नैदी दर्गा : जतसारख्या दूर्गम भागात इराकची राजधानी बगदाद येथून एखादे सूफी संत येऊन त्यांनी एक वसाहत नव्हे तर गाव स्थापन केल्याचे आपणास कुणी सांगितले तर निश्चितच आश्चर्याचा धक्का बसेल. मात्र हे सत्य आहे. सहाशे वर्षांपुर्वी बगदादपासून सुमारे चार हजार किलोमीटरचे अंतर पार करून एक सूफी संत जत तालुक्यातील करजगी येथे आले. त्याच ठिकाणी त्यांनी आपली वसाहत निर्माण केली. त्यांचे नाव
आहे, हजरत शेख मकतुम बुजरूक जून्नैदी.आज हे करजगीचे ग्रामदैवत आहेत.आदिलशाही कालखंडात गोलघुमटच्या धर्तीवर बांधलेला त्यांचा सुंदर दर्गाही करजगी येथे आहे. गावात त्यांचे असंख्य पूर्वज आहेत. हिंदू-मुस्लीम ऐक्याचे प्रतिक असलेल्या या दर्ग्यामूळे गावास वैभव प्राप्त झाले आहे.जतच्या पूर्वेस 48 किलोमीटर अंतरावर करजगी नावाचे ऐतिहासिक गाव आहे. या गावास शेकडो वर्षांपासून खूप ऐतिहासिक महत्व आहे. विजापूरच्या आदीलशाहीने डफळे राजघराण्यास चार परगण्याची देशमुखी दिली होती, त्यापैकी करजगी हा एक परगना होता.अनेक ऐतिहासिक कागदपत्रांमध्ये या गावाचा उल्लेख आढळतो. मात्र या गावाची आगळीवेगळी ओळख निर्माण झाली आहे,ती सूफी संत जून्नैदी यांच्यामुळे गावच्या मध्यवर्ती ठिकाणी जून्नैदी यांचा ऐतिहासिक सुंदर दर्गा आहे.दर्ग्याचे सध्या पूर्वेकडून प्रवेशद्वार आहे. उंच पायऱ्या चढून कमानीमधून आत प्रवेश केला की,दर्ग्याचा मुख्य घुमट समोर दिसतो.विजापूरच्या गोलघुमटसारखी या घुमटाची रचना आहे. तत्कालीन वास्तुकलेचा हा एक सुंदर व अप्रतिम नमुना संपुर्ण दगडी बांधकामावर हा घुमट उभारण्यात आला आहे. मात्र आतिल इमारतीस सिमेंटने गिलावा केल्याने त्याचे प्राचीन वैभव लोप पावले आहे.त्याची भव्यता डोळ्याचे पारणे फेडते.या जीनेसाहबे ऊरूसास भाविकांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा असे आवाहन संयोजनकांनी केले आहे.