उमदी : जत तालुक्यातील आंसगी जत येथे बेकायदा दारूच्या अड्ड्यावर उमदी पोलीसांनी छापा टाकला.आंसगी जत येथील महादेव गुंडा माने हा बाजार कट्ट्याच्या बाजूला हा देशी दारू विक्री करित होता.तेथे पोलीसानी छापा टाकून देशी दारूच्या 728 रूपयाच्या 14 बॉटल जप्त केला.तत्पुर्वी रवीवारी जाड्डरबोबलाद येथील नागराज रमेश कांबळे व उटगी येथील सिध्दाराम शिधा कोळी हे बेकायदा दारू विकत असताना पोलीसांनी छापा टाकला.माजी आमदार विलासराव जगताप यांनी आंदोलनाचा इशारा देताच पोलीसांनी अवैध धंद्याविरोधात छापासत्र सुरू केले आहे.