आमदार सांवतांचे आदेश,कचरा हटविला | विजापूर-गुहागर मार्गावरील डेपो लवकरचं निगडी रोडला हलविणार

0
3

जत,प्रतिनिधी : जत शहराला धोकादायक ठरणारा स्मशान भूमीनजिकचा कचरा डेपो अखेर हटविण्यास रविवार पासून सुरू झाली.आमदार विक्रमसिंह सांवत यांनी नुकत्याच घेतलेल्या आढावा बैठकीत नगरपालिका प्रशासनाला कचरा,अस्वच्छता व आरोग्याच्या प्रश्नावरून चांगलेच सुनावले होते.विजापूर-गुहागर महामार्गावरच थेट कचरा टाकण्याचा प्रकाराबाबत सांवत यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली होती.त्या पार्श्वभूमीवर अखेर रविवारपासून नगरपालिका प्रशासनाने कचरा हटविण्यास सुरूवात केली.

तात्पुरत्या स्वरूपात हा कचरा मार्गावरून हटविण्यात आला आहे. येत्या आठ दिवसात निगडीरोडला पालिकेच्या वतीने घेतलेली जागा ताब्यात येताच तेथे कचरा टाकण्यात येणार आहे.त्यामुळे शहरातील कचऱ्यांची समस्या

पुर्णत: सुटणार आहे.महामार्गावरील कचरा डेपोतील कचरा मोठ्या जेसीबीद्वारे रवीवारी काढण्यात येत होता.

तात्पुत्या स्वरूपात हा कचरा ओढापात्रालगत ढकलण्यात आला आहे. डेपोसाठी घेतलेली जागा ताब्यात येताच तेथील कचरा उचलून नवीन जागेत टाकण्यात येणार आहे. स्मशानभूमी नजिकच्या गँस दाहिनेचे काम पुर्णत्वाकडे आले आहे.त्यामुळे तेथील मोकळ्या जागेत झाडे,बसण्याची व्यवस्था,पाणी आदी सुविधा उपलब्ध करून शुभोभिकरण करण्यात येणार आहे.

यापुढे दहा घंटागाडीच्या माध्यमातून ओला,सुका कचरा वर्गीकरण करून प्रक्रिया करण्यासाठी प्रयत्न सुरु करण्यात येणार आहेत.त्याशिवाय आरोग्याच्या दृष्टीनेही उपाययोजना करण्यात येणार असल्याचे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले. दरम्यान कचरा हटविण्यात येत असल्याने समाधान व्यक्त होत आहे.

दोन आठवड्यात कचऱ्यांची समस्या संपेल  : भूपेंद्र कांबळे

विजापूर-गुहागर मार्गावरील कचरा हटविण्यात आला आहे,निगडीरोडची जागा येत्या आठ दिवसात ताब्यात येणार आहे. यापुढे तेथे खड्डा पाडून तेथे कचरा टाकण्यात येणार आहे,त्यामुळे येत्या काही दिवसात कचऱ्याचा प्रश्न कायमस्वरूपी निकालात निघणार आहे.स्मशान भूमीनजिक गँस दाहिनीचे काम पुर्ण झाले आहे.त्यामुळे तेथील परिसराचे शुशोभिकरण करण्यात येणार आहे.शहरातील पाण्याचा प्रश्नही सोडविण्यासाठी आमचे गतीने प्रयत्न सुरू आहेत,अशी माहिती नगरसेवक भूपेंद्र कांबळे यांनी दिली.

जत : शहरातील विजापूर-गुहागर मार्गावरील कचरा हटविण्याचे काम सुरू करण्यात आले

Attachments area

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here