जत,प्रतिनिधी : जत तालुक्यात दिवाळी पारंपरिक पध्दतीने उत्साहात संपन्न झाली.दिवाळी लक्ष्मीपुजनानंतर पाडव्याच्या दिवशी मेंढरांना पळविण्याचा कार्यक्रम झाला.त्याशिवाय पारंपरिक खेळ घेण्यात आले.डफळापूर येथील मुख्य बाजार पेठेत जमीनीपासून चार-पाच फुटवर नारळाचे तोरण बांधण्यात आले होते.त्यांच्या खालून मेंढराचे कळप पळविण्यात येत होते.कळपातील मेंढरांनी नारळाचे तोरण तोडायचे होते.मात्र अनेक कळपातील मेंढराना पळविण्यात आले.मात्र तोरण तोडण्यात एकाही कळपाला यश आले नाही.मात्र पारपांरिक महत्व जपण्यात आले.दुसरीकडे तालुक्यात दिवाळीचा उत्साह घरोघरी दिसून येत आहे.
डफळापूर येथे दिवाळीनिमित्त मेंढरांना पळविण्यात आले.





