जत,वार्ताहर : संख परिसरातील संख ते तिकोंडी, अंकलगी ते उटगी या दोन्ही रस्त्याच्या डांबरीकरण कामाची चौकशी होऊन दोषीवर कारवाई अशा मागणीचे निवेदन स्वा.शेतकरी संघटनेच्या वतीने बांधकाम विभागाला देण्यात आले आहे.
निवेदनात म्हटले आहे की,गेल्या सहा महिन्यापूर्वी संख ते तिकोंडी या राज्य मार्गाचे सहा महिन्यापुर्वी तर दोन महिन्यापूर्वी अंकलगी ते उटगी या रस्त्याचे डांबरीकरण झाले होते.या दोन्ही रस्त्याचे डांबरीकरण होऊन तीन महिन्यातच रोडची पूर्णपणे दुर्दशा झालेली आहे.रोडवर मोठमोठे खड्डे पडले आहेत.डांबरीकरण ठिकठिकाणी उखडत आहे.संपुर्ण रस्त्याचे काम पूर्णपणे निकृष्ट दर्जाचे झाले आहे. रोडवर पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहनचालक व शेतकऱ्यांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. या रोडला वाहतूक जास्त असल्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे.
या पद्धतीने निकृष्ट दर्जाचे काम करून शासनाच्या पैशाचे दुरुपयोग करून स्वतःच्या घर भरणाऱ्या ठेकेदार तसेच रोडचे गुणवत्ता तपासून चुकीचा अहवाल देणाऱ्या अधिकाऱ्यावर कायदेशीर कारवाई करावी.या निकृष्ट दर्जाच्या रस्त्याची उच्चस्तरीय तपासणी करून संबधित ठेकेदाराचे लायसन्स काळ्या यादीत टाकावे.तात्काळ कारवाई न केल्यास आपल्या कार्यालयासमोर आंदोलन करू असा इशारा संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे.
संख दोन्ही रस्त्याचे उखडत असलेले डांबरीकरण कामाची गुणवत्ता समोर आणत आहे.