संख,वार्ताहर : दिल्ली येथे झालेले सातव्या राष्ट्रीय सामुदायिक रेडिओ संमेलनात जत तालुक्यातील येरळावाणी रेडिओ केंद्राच्या ”एक धागा सुखाचा ” या कार्यक्रमास राष्ट्रीय स्तरावरील दुसरे पारितोषिक मिळाले.
स्थानिक कलांची जपणूक या विभागांतर्गत हा बहुमान मिळाला.केंद्रीय प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांच्याहस्ते केंद्र संचालक उदय गोडबोले यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
मानचिन्ह आणि 30 हजार रूपये असे पुरस्काराचे स्वरूप आहे.जत तालूक्यातील वळसंग गावातील मेढ्यांच्या लोकरीचे जेन तयार करण्याचा पारपांरीक तयार व्यवसाय करणाऱ्या नदाफ कुंटुबावर आधारीत हा कार्यक्रम होता.
या कार्यक्रमाचे लेखन सानिका खरे तर आश्विनी खाडिलकर यांची निर्मिती होती.क्षितिजा केळकर,जान्हवी खाडिलकर,माधूरी जिमगे,अनुराधा कुंटे,बसवराज अलगुरे महाराज,दिनराज वाघमारे यांचा हि या निर्मितीत सहभाग होता.हा पुरस्कार मिळाल्याबदल संस्थेचे सचिव नारायण देशपांडे यांनी टिमचे कौतुक केले.
येरळावाणी रेडिओची केंद्र शासनाच्या वतीने टीम स्थानिक कलाची जपणूक या विभागात द्वितीय पुरस्कार देण्यात आला.