जत,प्रतिनिधी : सन 2004 मध्ये दाखल मारामारीच्या गुन्ह्यांत अटक केलेला आरोपी कामा साधा कोकरे रा. सिध्दनाथ, ता.जत जि.सांगली हा जत न्यायालयात सुमारे 15 वर्षापासून सुनावणी कामी हजर राहत नव्हता.जत न्यायालयाने त्याचे विरुध्द अटकेचे वॉरंट काढले असताना सुध्दा तो वॉरंट बजावणी टाळत होता.म्हणून कोर्टाने त्याचेविरूध्द स्थायी अटक वॉरंट काढले होते.तसेच आरोपी बाळू शंकर शिंदे रा सिध्दनाथ ता जत जि सांगली यास सन 2006 साली सरकारी अधिकाऱ्यास मारहाण करून सरकारी कामात अडथळा करून शिवीगाळ दमदाटी केल्याबाबत गुन्हा दाखल होवून त्यास सदर गुन्हयात अटक झालेली आहे. तो सुध्दा सुमारे 13 वर्षांपासून सदर केसचे सुनावणी करीता न्यायालयात हजर राहज नसल्याने त्याचेविरूध्द अटक वॉरंट काढले आहे.त्यांना सोमवार ता.19 रोजी पोलीस शिपाई शिवानंद चौगुले यांना त्यांचे खास बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, सदर आरोपी हे कामानिमित्त सिध्दनाथ गावी येणार आहेत.अशी बातमी समजल्यानंतर सहा.पोलीस निरीक्षक अनिल माने, पोहवा सचिन जवंजाळ,पोलीस नाईक विनायक शिंदे,संतोष खांडेकर,पोलीस कॉन्स्टेबल केरबा चव्हाण,शिवानंद चौगुले, विनोद हसबे यांनी सापळा रचुन आरोपी साधा कोकरे आणि बाळू शिंदे यास ताब्यात घेत जत न्यायालयाकडील अटकेचे वॉरंटमध्ये अटक केली आहे. सदरची कामगीरी उपविभागीय पोलीस अधिकारी श्री दिलीप जगदाळे, पोलीस निरीक्षक श्री शिवाजी गायकवाड यांचे मार्गदर्शनाखाली सहा.पोलीस निरीक्षक अनिल माने यांच्या पथकाने केली.
|
|