गुगवाड | एकूंडी येथे बसवसेनेच्या वतीने विद्यार्थ्यांना वह्या वाटप |

0
12

गुगवाड,वार्ताहर : बसवसेना संघटनेच्या वतीने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा एकुंडी येथे तसेच गुडोडगीवस्ती येथील शाळेतील विद्यार्थ्यांना संस्थापक बसवराज पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त वही-पेन-खाऊ वाटप करण्यात आले.यावेळी मलगोंडा हेळकर, सुरेश चौगुले, सदाशिव शेगावे, सुरेश शेगणे,अनिल गुडोडगी, हणमंत लंगुटे हे उपस्थित होते. बसवसेनेचे संस्थापक, अध्यक्ष तथा एकुंडीचे सरपंच बसवराज पाटील हे संघटनेच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम राबवीत असून शालेय विद्यार्थ्यासाठी शैक्षणिक साहित्य वाटप हा बसवसेनेचा यंदाचा उपक्रम असल्याचे डॉ रविंद्र शेगावे यांनी सांगितले.एकुंडी, ता.जत येथील प्राथमिक व गुडोडगीवस्ती येथील दोन्ही शाळांमध्ये दरवर्षी प्रमाणे हा उपक्रम यंदा राबविण्यात आला आहे. याचबरोबर बसवसेनेच्या वतीने ज्येष्ठ नागरिकांसाठी लवकरचं विविध उपक्रम राबविले जाणार आहेत.ग्रामीण भागातील गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देणे हा बसवसेनेचा उद्देश असल्याचे डॉ.शेगावे यांनी प्राथमिक शाळा एकुंडी येथे घेतलेल्या कार्यक्रमामध्ये सांगितले.यावेळी रासपचे जिल्हाध्यक्ष अजित पाटील,पत्रकार राजू ऐवळे,एकुंडी प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक मच्छिंद्र ऐनापूरे,गुडोडगीवस्ती शाळेचे मुख्याध्याध्यापक संभाजी सुतार, उपसरपंच सरोजनी कोरे,शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष बाळासो कोरे,मलगोंडा नाईक व दोन्ही शाळांचे शिक्षक वृंद व विद्यार्थी उपस्थित होते.एंकूडीचे संरपच बसवराज पाटील यांच्या वाढदिवसानिमि वह्या व खाऊचे वाटप करण्यात आले.

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here