जत,प्रतिनिधी : जत तालुक्यातील दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर जत तालुक्यातील दुष्काळाची पाहणी करण्यासाठी आज केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले जत दौऱ्यावर येत आहेत.त्यांच्या सोबत महात्मा फुले महामंडळाचे अध्यक्ष राजाभाऊ सरवदे,आ.विलासराव जगताप,आरपीआयचे प्रदेश सचिव विवेक कांबळे हे उपस्थित राहणार आहेत. उमदी ता.जत येथील दुष्काळाची पाहणी,ग्रामपंचायत सभागृहात दुष्काळी जनतेशी संवाद साधणार आहेत.अशी माहिती जिल्हाध्यक्ष संजय कांबळे यांनी दिली.
श्री.कांबळे म्हणाले,जत तालुक्यात भिषण दुष्काळाने होरफळत आहे.पिण्याच्या पाण्यापासून अन्न धान्य,जनावरांचा चारासह रोजगाराचा प्रश्व गंभीर बनला आहे.जिल्ह्यासह तालुक्यातील जनतेच्या प्रश्नासाठी जिल्ह्याचे सुपुत्र असेलेले ना.आठवले हे कायम लक्ष ठेऊन असतात.जिल्ह्यातील दुष्काळी तालुक्याला भरीव मदत करावी यासाठी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री महोदयाची भेट घेत परिस्थिती मांडली आहे.सांगलीसह सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळी जनतेच्या समस्या जाणून घेण्यासाठी ते आजपासून दुष्काळी दौऱ्यावर आहेत.सोलापुर जिल्ह्यातील सांगोला, सोलापूर,दक्षिण, उत्तर सोलापूर,मंगळवेढा मार्गे ना.आठवले जत तालुक्यातील दुष्काळाचा सर्वाधिक फटका बसलेल्या उमदी येथे पाहणी करणार आहेत.त्यानंतर ते दुष्काळात प्रशासन,शासन व शेतकरी,ग्रामस्थांशी संवाद साधून समस्या जाणून घेणार आहेत.नागरिकातून आलेल्या सुचना,व समस्या मुख्यमंत्री व केंद्रीय मंत्र्याकडे मांडून जतसाठी भरीव निधी देत दुष्काळी जनतेसाठी तातडीने मदत द्यावी अशी सुचना करणार आहेत.
कांबळे म्हणाले,जत तालुक्यातील दुष्काळ, म्हैसाळ योजना,टँकर मागणी,प्रशासनातील अनेक प्रश्नावर सातत्याने अंदोलने करत आहेत. दुष्काळी उपाययोजन द्या या मागणीसाठी रिपब्लिकन पार्टीच्यावतीने सर्वात पहिले अंदोलन करण्यात आले होते. त्यापार्श्वभूमीवर ना.रामदास आठवले जत तालुक्यातील दुष्काळाची पाहणी करणार आहेत.तालुक्यातील जनतेने मोठ्या संख्येने उमदीत उपस्थित रहावे असे आवाहन जिल्हाध्यक्ष संजय कांबळे यांनी शेवटी केले.