जत,प्रतिनिधी :“वारी” हा शंब्द कानी पडताच आठवण येते ती पंढरपूर येथे संपन्न होणाऱ्या सोहळ्याची ऊन,वारा वादळ पाऊस या कशाचीही पर्वा न करता हरिनामाचा गजर, जयघोष करत पायीदिंडी वारकरी पंढरी पोहचतात.अशा एका चैत्रीवारी पायी दिंडीचे आयोजन चिखलगी भुयार मठाचे मठाधिपती ह.भ.प. तुकाराम महाराज यांनी केले असून दिंडीचा एक प्रमुख म्हणून या वारकरी भक्तांच्या सोयीसाठी दिंडी संकल्पनेची योजना आखली आहे. वारीला जाणाऱ्या या वारकरी भक्तांची निवास तसेच भोजन,अन्य सुविधेसब सर्व प्रकारची सोय महाराजांनी स्वखर्चाने केली आहे.तुकाराम महाराज स्व:ता वारीत सहभागी होत पुढील पिढ्यांना वारकरी संप्रदाय माहित होण्यासाठी माध्यमिक शाळामध्ये प्रबोधन केले जाते.वारकरी भक्तांशी संवाद साधतात, वारीचा अनुभव घेतात तसेच वारीतील गर्दीमुळे होणारी अस्वच्छता दूर करण्यासाठी स्वच्छता अभियान केले जाते.अनेक भक्तांच्या सहवासात व पताका,टाळ नि मृदुंग यांनी हा सोहळा लक्षवेधी केला जातो.या दिंडीचे प्रस्थान दि. 12 एप्रिल रोजी पहाटे 5 वा.गोंधळेवाडी येथून होत असून दि.13 एप्रिल रोजी जाल्याळ येथे अमृत पाटील यांचे घरी मुक्काम,दि.14 एप्रिल रोजी गुंजेगाव प्रफुल्ल पाटील, दि.15 एप्रिल रोजी पंढरपूर श्रीसंत बागडेबाबा मठ भक्ती मार्ग,दि.16 एप्रिल नगर प्रदक्षिणा असा सोहळा संपन्न होत आहे.
वारकरी संप्रदायातील वारसा असणारे तुकाराम बाबा यांनी जत तालुक्याच्या पाणी प्रश्नासाठी सामाजिक कार्यात मोठ्या जिद्दीने पुढाकार घेतला असून तालुक्यातील वंचित गावांसाठी मोठा लढा उभा केला आहे.
Attachments area