को.बोबलाद,वार्ताहर : डिंसेबर महिना चालू झाल्यापासून उन्हाची दाहकता वाढत चालली तशी दुष्काळी टंचाई आणि पाण्या विना जगणं मुश्कील होत आहे. करेवाडी को. बो.मधील चिमुकले दुष्काळावर मात करण्यासाठी पुढे सरसावले आहेत.
अमिर खानच्या पानी फाउंडेशनच्या माध्यमातून ट्रेनिंग व कॅम्प मधून प्रशिक्षण घेतलेले मलकरसिद्ध तांबे,जनार्दन गोपणे,छाया गोपणे,पूजा गोपणे,यशवंत करे यांनी पुढाकार घेत माळावर गाव पाणीदार करण्यासाठी श्रमदान सुरू केले.त्यांना गावातील सुमारे 25 वर चिमुकल्याचे साथ लाभली आहे.या चिमुकल्याचे हात श्रमदानासाठी पुढे सरसावले आहेत. प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांना घेत गाव दुष्काळमुक्त करण्यासाठी गोपणे आणि तांबे यांनी कामाला सुरुवात करत पाया रचला आहे.बानीबानीतून मुक्तीसाठी गावातील तरुण व महिला वर्गानी सहभागी होत गाव पूर्ण दुष्काळमुक्त करण्यासाठी योगदान द्यावे.असे आवाहन करण्यात आले.
करेवाडी(को.बो.)येथील चिमुकल्यानी दुष्काळ मुक्तीसाठी घेत श्रमदान सुरू केले.