डफळापूर | दत्त पतसंस्थेच्या लवकरचं सांगली,मिरजेत शाखा |

0
9

डफळापूर: येथील श्री.दत्त पतसंस्थेच्या सांगली,मिरज शाखेस मंजूरी मिळाली असून लवकरचं तेथे शाखा सुरू होतील अशी माहिती संस्थापक चेअरमन बाबासाहेब माळी यांनी दिली.17 वर्षापुर्वी विक्रमसिंह सांवत यांच्या मार्गदर्शनाखाली डफळापूर येथून सुरू झालेल्या पतसंस्थेने 100 कोटीवर व्यवसाय पोहचविला आहे.संस्थेच्या डफळापूर मुख्यालयासह, कवटेमहाकांळ,माडग्याळ येथे सध्या शाखा कार्यरत आहेत.त्याशिवाय सिध्दिविनायक पतसंस्था,जत वरदविनायक को-ऑफ क्रेडिट सोसायटी या संलग्न दोन संस्था दत्त पतसंस्थेच्या माध्यमातून चालविल्या जात आहेत.पारदर्शी कारभार व खातेदारांना अग्रस्थानी ठेवत संस्थेचे कामकाम चालते.जत कवटेमहाकांळ तालुक्यातील जवळपास सर्वच गावातून छोटी बचत ठेव संस्थेत येथे आंशी टक्कर खातेदारांना खर्च वाटप करण्यात आले आहे. अल्प कागदपत्रात तात्काळ कर्ज मंजूरी मुळे संस्थेची नावलौकिक आहे.गत सालात संस्थेने मोठी भरारी घेतली आहे. व्यवसाय वाढीबरोबर नव्याने दोन शाखा सुरू होत आहेत.जत कवटेमहाकांळ तालुक्यात पतसंस्था क्षेत्रात नवे पर्व आणलेली श्री. दत्त पतसंस्था आता सांगली मिरजेतील खातेदारांच्या सेवेसाठी विस्तारत आहे.

अप्पर निंबधक सहकारी संस्था(पतसंस्था)पुणे या कार्यालयाकडून संस्थेस सांगली,मिरज येथे परवानगी दिली आहे.

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here