संख,वार्ताहर : जत पुर्व भागातील 42 गावांना प्रंसगी स्व:खर्चातून कँनॉल काढून पाणी देण्याचा विडा उचलेले गोंधळेवाडी मठाचे मठाधिपती हभप तुकाराम महाराज यांनी या वचिंत गावांवा पाणी मिळवून द्यावे या मागणीचे निवेदन खा.संजयकाका पाटील यांना दिले.त्यांनी या गावातील शेतकऱ्यांच्या उपस्थितीत माडग्याळ येथे घेतलेल्या शेतकरी मेळाव्याची माहिती खा.पाटील यांना दिली.सध्या हा भाग पाणी टंचाईच्या चटक्याने भाजून निघाला आहे.पाणी टंचाईच्या मरणयातना संपाव्यात यासाठी मी माणूसकीच्या नात्याने पुढाकार घेतला आहे.सरकारनेही त्यासाठी उपाययोजना कराव्यात अशी मागणी तुकाराम महाराज यांनी खा.पाटील यांच्याकडे केली.
संख: गोंधळेवाडी मठाचे मठाधिपती तुकाराम महाराज खा.संजयकाका पाटील यांना निवेदन देताना