अल्पवयीन मुलीची छेडछाड प्रकरण
जत,प्रतिनिधी : खलाटी (ता.जत) येथील अल्पवयीन मुलीची छेडछाड केल्याप्रकरणी बाल लैंगिक अत्याचार (पोस्को)अंतर्गत खंडू मल्हारी बनसोडे या तरूणाविरोधात जत पोलीसात गुन्हा दाखल झाला.तर पिडित मुलीची छेडछाडीचा जाब विचारणाऱ्या वडीलाला शिवीगाळ करून मारहाण केल्याप्रकरणी खंडू बनसोडे,श्रीधर अशोक बनसोडे,विशाल वसंत बनसोडे,बंडू मल्हारी बनसोडे,पिरासाहेब श्रीकांत बनसोडे,चैतन्य श्रींकात बनसोडे (सर्व रा.खलाटी) या सहा जणाविरोधात मारहाणीचा दुसरा गुन्हा दाखल झाला.
पोलीसाकडून मिळालेली अधिक माहिती अशी,खलाटी येथे सातवीच्या वर्गात शिकणाऱ्या 12 वर्षीय पिडित मुलगी व तिची नवीत शिकणारी बहिण खलाटी येथे शिक्षण घेतात.खंडू गेल्या सहा महिन्यापासून या दोघी बहिणीची शाळेला जाताना छेडछाड काढायचा,यापुर्वी पिडित मुलीच्या वडिलांनी खंडूच्या वडीलाला याबाबत मुलाला ताकीद करण्यास सांगितले होते.मी समजावून सांगतो म्हणून खंडूच्या वडीलांनी सांगितल्याने पिडीत मुलीच्या वडीलांनी त्यावेळी तक्रार केली नव्हती. मात्र खंडूत काहीही फरक पडला नाही.त्यांचे असे कृत्य चालू होते.काही मित्राकडून पिडित मुलीला चिठ्ठी देण्याचा प्रयत्न खंडूने केला होता.बुधवार ता.6 मार्च रोजी सकाळी आठ वाजता पुन्हा खंडूने एका मित्राकरवे पिडीत मुलीला चिठ्ठी देण्याचा प्रयत्न केला.हा प्रकार शाळेतील मँडमच्या लक्षात आल्यानंतर ती चिठ्ठी मँडमनी काढून घेतल्याचे पिडीत मुलीने फिर्यादीत म्हटले आहे.दरम्यान पिडित मुलींने हा प्रकार घरात सांगितला.वडीलांनी खंडूला खलाटी स्टँडवर गाठत मुलीच्या छेडछाडी जाब विचारला असता खंडूसह श्रीधर अशोक बनसोडे,विशाल वसंत बनसोडे,बंडू मल्हारी बनसोडे,पिरासाहेब श्रीकांत बनसोडे,चैतन्य श्रींकात बनसोडे या सहा जणांनी मिळून त्यांना मारहाण केल्याचे पिडीत मुलीच्या वडीलांनी दिलेल्या वेगळ्या फिर्यादीत म्हटले आहे.अधिक तपास पोलीस उपनिरिक्षक रणजित गुंडरे करत आहेत.