बिळूर | चार महिन्यात म्हैसाळ योजना पुर्ण करणार : खा.संजयकाका पाटील | बिळूरमध्ये पाण्याचे पुजन : हत्तीवरून साखर वाटत आंनदोत्सव |

0
1

ऐतिहासिक सत्कार सोहळा
गुगवाड,वार्ताहर : बिळूरसह तालुक्यातील प्रत्येक शेतकऱ्याला पाणी देण्यासाठी खासदारकी पणाला लावू,पंतप्रधान कृषी सिंचन योजनेत या योजनेचा समावेश झाल्याने जूनपर्यत म्हैसाळ योजनेची उर्वरित सर्व कामे पुर्ण केली जाणार आहे.
शेतकऱ्यांकडून फक्त 19 टक्के पाणीपट्टी घेऊन हे पाणी दिले जात आहे.त्यामुळे अल्प खर्चात हे पाणी येथपर्यत येत आहे.भविष्यात तालुका म्हैसाळ कँनॉलच्या माध्यमातून ओलिताखाली आणू असे प्रतिपादन खा.संजयकाका पाटील यांनी केले.ते बिळूर येथे आलेल्या  पाण्याचे पुजन प्रंसगी बोलत होते.बिळूर ता.जत येथील आरवक्की तलावात आलेल्या म्हैसाळ पाण्याचे पुजन कृष्णा खोरे महामंडळाचे उपाध्यक्ष तथा खा.संजय काका पाटील व आ.विलासराव जगताप यांच्या हस्ते झाले.तब्बल शंभर किलोमीटरचा प्रवास करत दोन पंपहाऊस मधून कृष्णामाई बिंळूरमध्ये दाखल झाली आहे.ते पाणी आणण्यासाठी खा.पाटील व आ.जगताप यांनी विशेष प्रयत्न केले होते.त्यामुळे बिळूर ग्रामस्थांच्या वतीने खा.पाटील व आ.जगताप यांचे भव्य सत्कार करण्यात आला.म्हैसाळचे पाणी बिळूरमध्ये आल्याबद्दल हत्तीवरून साखर वाटप करून आंनदोत्सव साजरा करण्यात आला. सजविलेल्या रथातून खा.पाटील व आ.जगताप यांची गावातून मिरवणूक काढण्यात आली. तलावातील पाणी पुजनानंतर गावात भव्य सत्कार सोहळा संपन्न झाला.यावेळी माजी सभापती प्रकाश जमदाडे, म्हैसाळचे अधिक्षक अभियंता हणमंत गुणाले,सभापती सुशिला तांवशी,आप्पासाहेब नामद,रामाण्णा जिवाण्णावर, संरपच नागनगौडा पाटील,उमेश सावंत,सुनिल पवार सह लोकप्रतिनिधी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
खा.पाटील म्हणाले,बिळूर मध्ये पाणी आणण्याचा मोठा टप्पा पुर्ण झाला आहे. त्यामुळे मलाही मोठा आनंद झाला आहे. या योजनेचा केंद्रीय सिंचन योजनेत समावेश झाला आहे.केंद्राकडून 2092 कोटीचा निधी मिळाला असून येत्या चार महिन्यात योजनेचे काम पुर्ण होणार आहे. त्यामुळे यातून येणाऱ्या पाण्यात तालुक्यातील शेतकरी समृद्ध होणार आहे.
आ.विलासराव जगताप म्हणाले, बिळूरमध्ये ऐतिहासिक क्षण म्हणून नागरिकासह मी अमृत योग मानतो.बिळूरच्या शेतकऱ्यांचे यामुळे कल्याण होणार आहे. त्याचा आनंद म्हणून बिंळूरकरांनी हत्तीवर साखरवाटून आंनद साजरा केला.आम्हची काढलेली भव्य मिरवणूक आयुष्यात चांगले काम केल्याची पोचपावती मिळाली आहे.1988 साली प्रस्तापित राजकारण्याच्या विरोधात तालुक्याला मातीत घातलेल्या विरोधात बंड करत तालुक्यातील नागरिकांचे प्रश्न सुटावेत,तालुक्याचे विभाजन व्हावे,पाणी मिळावे,सिंचन योजना व्हाव्यात यासाठी शासकीय नोकरी सोडून राजकारणात आलो.आतापर्यत तीव्र संघर्ष केला आहे.जेलमध्येही जावे लागले आहे.मात्र जनतेच्या आंनदासाठी जे केले त्याचे मोठे समाधान मला मिळाले आहे. तालुक्यात हाजारो कोटी रूपयाची विकास कामे खेचून केली आहेत.जनहितासाठी राजकारण केले आहे.
गुगवाड : म्हैसाळ योजनेतून बिळूरमधील तलावात आलेल्या पाण्याचे पुजन खा.संजयकाका पाटील व आ.विलासराव जगताप,प्रकाश जमदाडे यांच्या हस्ते करण्यात आले.

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here