जत,प्रतिनिधी ; जत तालुक्यातील कायमस्वरूपी दुष्काळ संपवण्यासाठी गेल्या चार वर्षांपासून अहोरात्र प्रयत्न करणारे खासदार संजयकाका पाटील व आमदार विलासराव जगताप हे पाणीदार हस्ती असल्याचे व त्यांच्या सततच्या पाठपुराव्याने जत तालुक्यातील दक्षिण-उत्तर भागात कृष्णामाईचे पाणी पोहोचले आहे.यासारख्या योजना राबवून सर्वांगीण विकास करण्यासाठी या दोघाचे योगदान महत्वपूर्ण असल्याचे मत माजी सभापती प्रकाश जमदाडे यांनी व्यक्त केले.जत तालुक्यातील बिळूर येथील आरबक्की तलावातील पाणी पूजन कार्यक्रमाच्या आढावा संदर्भातील बैठकीत ते पत्रकारांशी बोलत होते. जमदाडे पुढे म्हणाले,म्हैशाळ योजनेतून तालुक्यातील उत्तरेला येळवी तलावात तर दक्षिणेला बिळूर तलावात पाणी आणण्याचे महत्वपूर्ण काम खा.पाटील व आ. जगताप यांनी केले आहे. आघाडी सरकारच्या काळात पुढे न सरकलेली योजना गतीने पूर्ण करण्याचे श्रेय खा.पाटील व आ.जगताप या दोघांना जाते.तालुक्यातील वंचित भागांना सिंचन योजना करून, पाणी देण्यासाठी त्यांचे पुढेही प्रयत्न सुरू आहेत. त्यात लवकरचं तालुका पाणीमय होणार एवढे निश्चित. खासदार पाटील यांनी म्हैसाळ योजनचे जत तालुक्यातील महत्व ओळखून कामे गतीने करून पाणी सोडण्यासाठी प्रयत्न केले आहेत.म्हैसाळ योजना केंद्रीय प्रधानमंत्री सिंचन योजनेत समावेश करून घेतला.आतापर्यंत 2092 कोटी रुपयांचा निधी योजनेला मिळाला आहे. खा.पाटील यांची लोकतळ व काम करण्याची पद्धत याची दखल घेत भाजप नेतृत्वाने त्यांना म्हैशाळ कृष्णा खोरे महामंडळाचे उपाध्यक्ष करून गौरव केला आहे.जत तालुक्यात या योजनेचे थांबलेले काम गतिने सुरु आहे.जवळपास मोठ्या प्रमाणात तालुक्यातील गावात पाणी आले.शेती बहरली आहे. तालुक्यातील शेवटचे टोक असणाऱ्या उमदी गावात या योजनेतून पाणी देण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे.येत्या तीन-चार महिन्यात तेथे पाणी पोहचेल इतक्या गतीने काम सुरू आहे.439 किलोमीटर बंदिस्त पाईपलाईनद्वारे 2000 हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. त्यासाठी एक कोटी 78 लाख 80 हाजार रुपयाचा निधी अपेक्षित आहे.सर्वाधिक महत्वपूर्ण म्हणजे या सिंचन योजनेतून येणाऱ्या पाण्याची पाणीपट्टी विजबिल 81 टक्के शासन 19 टक्के शेतकरी अशा पद्धतीने भरून घेतली जाते.त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. याशिवाय खा.पाटील व आ.जगताप यांच्या प्रयत्नामुळे जत तालुक्यात चार राष्ट्रीय महामार्ग मंजूर झाले आहेत. त्याची कामे गतीने सुरू आहेत.भविष्यात या महामार्गाचा तालुक्याला मोठा फायदा होणार आहे
बेरोजगारी हटवणे, शेतमालाल विक्री, हमीभाव एमआयडीसी,छोटे-मोठे उद्योग यामुळे वाढणार आहेत. त्याचा फायदा थेट बेरोजगार तरुणांच्या हाताळा काम मिळण्यासाठी होणार आहे.जत तालुक्याच्या सर्वाधिक समस्या खा. पाटील व आ. जगताप यांच्या प्रयत्नातून आहे.त्यामुळे सर्वागिंण विकास कामांसाठी काम करणाऱ्या या हक्काच्या माणसांना साथ देण्याची गरज आहे.
महाकठीण काम पुर्ण करून बिळूरला पाणी
बिळूर सारख्या अडचणीच्या टप्प्यातील काम पूर्ण करत,2 पंपहाऊस, लोखंडी पाईपलाईन,माती कॅनल अशा अथक परिश्रमातून त्यांनी बिळूरमधील आरबक्की तलावात पाणी सोडण्याचे महत्वपूर्ण काम करून बिळूरकरांना एक प्रकारे जीवदान दिले.त्यामुळे त्यांचा आजचा गौरव हा न भूतो ना भविष्यती होणार असल्याचे जमदाडे यांनी सांगितले.