जत,प्रतिनिधी : जत शहरातील अविनाश साळुंखे खून प्रकरणातील संशयित यांना न्यायालयात उभे केले असता पाच दिवसांची पोलिस कस्टडी जत न्यायालयाने सुनावली याप्रकरणी पृथ्वीराज शंकर निकम (वय-19), विकास उर्फ सोनू बाळासाहेब भोसले (26), आकाश उर्फ मोनू बाळासाहेब भोसले (24) सर्व राहणार विठ्ठल नगर तुरेवाले प्लाँट जत यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. विठ्ठल नगर येथील सेंट्रींग कामगार अविनाश साळुंखे हा फेरफटका मारण्यासाठी चौकात आला असता संशयित आरोपीने इकडे का फिरतोस म्हणून काठ्या, गजाने मंगळवारी मारहाण केली होती. अविनाशला डोक्यात गंभीर दुखापत झाल्याने त्याचे उपचार सुरू असताना बुधवारी त्यांचे निधन झाले.याप्रकरणी जत पोलिसात अविनाशची पत्नी कविताने फिर्याद दिली.त्यात म्हटले होते की, पतीला या तिघा संशयिताने मारहाण करून जखमी केले.त्यातच अविनाशचा मृत्यू झाला.पोलिसांनी बुधवारी संशयितांना ताब्यात घेतले.गुरुवारी त्यांना न्या़यालयात उभे करण्यात आले. न्यायालयाने तपासकामासाठी संशयित आरोपींना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.