विठ्ठलनगर येथील तिघांविरोत गुन्हा दाखल
जत,प्रतिनिधी : जत शहरातील विठ्ठलनगर येथील अविनाश शिवाजी साळुंखे,(वय-30)या तरूणाचा किरकोळ कारणावरून डोक्यात काठीने मारहाण करून खून करण्यात आला.याप्रकरणी पृथ्वीराज शंकर निकम,विकास बाळासाहेब भोसले व त्याचा भाऊ आकाश भोसले यांच्याविरोधात जत पोलीसांत गुन्हा दाखल झाला आहे.
अविनाशची पत्नी कविता हीने जत पोलीसांत फिर्याद दिली आहे.
अधिक माहिती अशी, विठ्ठलनगर येथे राहणारा अविनाश हा सेंट्रिंग कामगार होता. मंगळवारी रात्री जेवण करून बाहेर फेरफटका मारण्यासाठी गेला होता.त्यावेळी पृथ्वीराज निकम याने चाैकात त्यास बोलावून घेतले. एवढ्या रात्री का फिरतोस असा जाब विचारला.यावेळी त्यांच्यात बाचाबाची झाली. पृथ्वीराज,आकाश व विकास यांनी अविनाश यास बेदम मारहाण केली.डोकीत काठीने प्रहार केला.अविनाशच्या डोकीतून रक्तस्त्राव होत होता.तसाच तो घरी गेला.रात्री उशीर झाल्याने सकाळी दवाखान्यास जाऊ म्हणून उपचार न करता झोपला.सकाळी पत्नीने त्यास उठविले. मात्र त्याने प्रतिसाद दिला नाही. त्याला तातडीने एका खासगी दवाखान्यात दाखल केले.मात्र त्याची प्रकृती गंभीर असल्याने त्यास मिरज येथील शासकीय रूग्णालयात हलविण्यात आले.उपचार सुरू असताना त्याचे निधन झाले.याबाबत जत पोलीसांत तिघांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.