राष्ट्रवादीकडून जुन्यानाच मुदत वाढ
जत,प्रतिनिधी : जत नगरपालिकेच्या विषय समितीच्या निवडी शुक्रवारी पार पडल्या.यात काँग्रेसने तीन नव्या चेहऱ्यांना संधी दिलीतर राष्ट्रवादीकडून जुन्याच सभापतीना मुदतवाढ देण्यात आली.काँग्रेस कडून नामदेव काळे,गायत्रीदेवी शिंदे,कोमल शिंदे यांना संधी देण्यात आली.राष्ट्रवादीचे उपनगराध्यक्ष आप्पा पवार यांची नियोजन आणि विकास समितीवर निवड करण्यात आली.तर विद्यमान समिती सभापती लक्ष्मण एडके, भारती जाधव यांना पुन्हा मुदतवाढ देण्यात आली.जत नगरपरिषदेत काँग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडीची सत्ता आहे. गेल्या वर्षी सत्ता स्थापन करण्यात आली होती.त्यावेळी वर्षासाठी सभापती पदाची संधी दिली होती.त्यांची मुदत संपल्याने नव्या निवडीचा कार्यक्रम शुक्रवारी प्रांताधिकारी तुषार ठोंबरे,मुख्याधिकारी अभिजित हराळे यांनी घेतला.सत्ताधारी गटाचे पुर्ण बहुमत असल्याने सर्व निवडी बिनविरोध पार पडल्या.नगराध्यक्षा शुंभागी बन्नेनवर,विद्यमान नगरसेवक इकबाल गंवडी,भुपेंद्र कांबळे,स्वप्निल शिंदे,अश्विनी माळी,बाळाबाई मळगे आदी उपस्थित होते.
गतवेळी कॉंग्रेस व राष्ट्रवादीने आघाडी करत सत्ता स्थापन केली होती.त्यावेळी तीन सभापती पदे कॉंग्रेस व दोन राष्ट्रवादीला देण्यात आली होती.गतवेळी कॉग्रेसकडून बसपचे भुपेंद्र कांबळे,साहेबराव कोळी,अश्विनी माळी यांना संधी दिली होती.तर राष्ट्रवादीकडून उपनगराध्यक्ष आप्पा पवार, सभापती लक्ष्मण एडके,भारती जाधव यांना संधी दिली होती.त्यांना यावेळीही कायम ठेवले आहे.त्यांत आप्पा पवार यांना नियोजन व विकास समितीची सुत्रे नव्याने प्रदान केली आहेत.सर्व सभापतीना पदभार देण्यात आला. निवडीनंतर नूतन सभापतीचा सत्कार करण्यात आला.
नाना शिंदे,श्रींकात शिंदे,नामदेव काळेचे वजन वाढले
कॉग्रेसचे नेते माजी नगरसेवक नाना शिंदे यांच्या पत्नी गायत्रीदेवी यांना महिला व बालकल्याण तर माजी उपनगराध्यक्ष श्रीकांत शिंदे यांच्या स्नुषा कोमल शिंदे यांना शिक्षण तर पहिल्यांदाच विजयी झालेले युवा नगरसेवक नामदेव काळे यांना महत्वाच्या बांधकाम सभापतीपदी निवड करत पक्ष श्रेष्ठीने संधी दिल्याने त्यांचे पक्षातील वजन वाढले आहे.