एका पशुवैद्यकीय डॉक्टरावर उपचाराची जबाबदारी
जत,प्रतिनिधी : जत तालुक्यातील पाच्छापूर येथे जनावरांना आलेली लाळ-खुरकत साथीने उग्ररूप धारण केले आहे. आतापर्यंत परिसरातील सुमारे 100 जनावरे दगावली आहेत.दररोज पाच ते सात जनावरे या आजाराची शिकार बनत आहेत. पशुवैद्यकीय विभाग प्रतिबंधक लस दिली म्हणून सांगत असतानाही जनावरे मरणाची संख्या कमी होत नाही. परिणामी शेतकऱ्यांतून संताप व्यक्त होत आहे.तीव्र दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर प्रारंभीच जनावरांच्या चाऱ्यासह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला असताना गेल्या पंधरवड्यापासून पाच्छापूर परिसरातील जनावरांना लाळ-खुरपत आजाराने वेढले आहे.येथील 500 जनावरांना या साथीची लागण झाली आहे.तोंडातून लाळ पडणे,पायाला जखमा होणे,ताप येणे आदी लक्षणे परिसरातील जवळपास सर्वच जनावरांना दिसत आहे. यामुळे चारा न खाण्याने जनावरे पायखोडून डोळ्यादेखत मुत्यूनुखी पडत आहेत. जत पशुवैद्यकीय प्रशासनाकडून प्रतिबंधक लस टोचण्याले सांगण्यात आले, मात्र लस देऊन सुद्धा जनावरे दगावण्याची संख्या कमी होत नसल्याने लसीच्या गुणवत्तेबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.पशुवैद्यकीय दवाखान्याकडून उपचार होत असतानाही जनावरे शेतकऱ्यांच्या दारासमोर तडफडून मरत आहेत.त्यामुळे अगोदरच निसर्गाने सर्व काही हिरावुन घेतलेल्या परिसरातील शेतकऱ्यांवरच्या जनावरावर बेतलेल्या या प्रकोपाने शेतकरी हवालदिल झाला आहे.जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांनी यात लक्ष घालून डॉक्टरांची संख्या स्वतंत्र टिम यासाठी लावून ही साथ आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करावेत.अशी मागणी होत आहे.दरम्यान व्हसपेठ परिसरातील जनावरांना या साथीची लागण झाल्याचे समोर येत आहेत.