माडग्याळ,वार्ताहर : माडग्याळ ता जत येथे जेष्ठ समाजसेवक अणा हजारेच्या लोकपाल मागणीसाठीच्या उपोषणला पांठिबा देण्यासाठी एकदिवसीय गाव बंद,लाक्षणिक उपोषण करत पाठिंबा देण्यात आला.सशक्त लोकपालसह विविध मागण्यासाठी अणा हजारे गेल्या तीन तारखेपासून उपोषण सुरू केले आहे. माझ्यात प्राण असेपर्यंत मी शेतकऱ्यासाठी लढणार आहे. शेतकऱ्यांना हमीभाव मिळावा.संपुर्ण शेतकऱ्यांना कर्जमुक्ती करावी,सातबारा कोरा करान ,कर्नाटक प्रमाणे विजबिल,स्वस्त धान्य मोफत द्यावेत,दुष्काळी सुविधा द्याव्यात आदी मागण्या माडग्याळकरांनी निवेदनाद्वारे सरकारला केल्या आहेत. विक्रम सांवत म्हणाले,काँग्रेस काळात सर्व समान्य नागरिकांना व शेतकऱ्यांना हमीभाव मिळत होता. गेल्या साडेचार वर्षापासून फक्त घोषणा करण्यात येत आहेत.सत्ता असताना अनेक अश्वासने दिले जातात.मोदी सरकार असो, किंवा फडवणीस सरकार असो सर्व समान्य जनता व शेतकऱ्यांना कुठल्याही योजना क्षमपणे राबवलेल्या नाहीत.माडग्याळ सह परिसराचा म्हैसाळ योजनेत समावेश केला आहे. तेथे गतीने कामे करून पाणी देण्यासाठी सरकार चालढकल करत आहे. तुबची-बबलेश्वर योजना सत्ताधाऱ्यांना आता महत्वपूर्ण वाटू लागली आहे.आम्ही गेल्या दहा वर्षापासून पाठपुरावा करत आहोत.आताचे लोकप्रतिनिधी,शासन आश्वासने,भेटी,निवेदनाच्या पुढे जात नाही.आम्ही हे पुर्व भागातील 42 गावाला पाणी देईपर्यत स्वस्त बसणार नाही.आमचा पाठपुरावा कायम आहे. माजी पंचायत समिती सदस्य कोडग,विठ्ठल निकम, बाळासाहेब कोरे,लक्ष्मण कोरे,शिवानंद हक्के, गावातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.