कुंभारी | येथे लवकरचं सुसज्ज प्राथमिक आरोग्य केंद्र उभारणार |

0
5

जाधव दांपत्याच्या पाठपुराव्याने शासनाकडून मिळाली साडेतीन एकर जमीन

जत,प्रतिनिधी : विजापूर-गुहागर महामार्गावर असणाऱ्या कुंभारी(ता.जत)येथे प्राथमिक आरोग्य केंद्र व्हावे अशी रुग्णांची मागणी होती. त्यासाठी पावणेचार कोटीचा निधीही उपलब्ध होता,पंरतू कुंभारीत जागा उपलब्ध नसल्याने काम अडले होते.अजिंक्यतारा विद्या प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष प्रभाकर जाधव, शेगाव जिल्हा परिषदेच्या सदस्या स्नेहलता जाधव या दांपत्यानी जिल्हाधिकारी ते मंत्रालय पर्यत पाठपुरावा करत कुंभारी प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी शासनाची गावलगतची साडेतीन एकर जागा मिळविली आहे. 

नुकतेच जिल्हाधिकारी विजयकुमार काळम-पाटील यांनी जागा उपलब्ध झाल्याचे पत्र जाधव दांपत्याकडे सोपवले आहे.जागेचा प्रश्न मिटल्याने कुंभारीत सुसज्ज प्राथमिक आरोग्य केंद्र उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

शेगाव जिल्हा परिषदेच्या सदस्यपदी निवडून आल्यापासून स्नेहलता जाधव यांनी खा. संजयकाका पाटील, आ.विलासराव जगताप व अँड.प्रभाकर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली कोट्यवधींची विकासकामे पुर्ण केली आहेत.अनेक मंजूर,व नियोजित आहेत. सिंचन,आरोग्य,शिक्षण, रस्तेसह अन्य कामांना प्राधान्य दिले आहे. शेगाव गटात कोल्हापूर पध्दतीचे बंधारे बांधण्याबरोबरच म्हैसाळचे पाणी मतदार संघातील शेवटच्या टोकापर्यत नेण्याचे काम त्यांनी केले आहे. बिरनाळसह चार गावांना टेंभूचे पाणी मिळावे यासाठी त्यांचा प्रयत्न सुरू आहे.

शेगाव आरोग्य केंद्रातील रिक्त जागा भरण्याबरोबरच शेगाव गटातील उपकेंद्रांना राज्य शासन व जिल्हा परिषदेकडून भरीव निधी खेचून आणला आहे. बिरनाळ येथे उपकेंद्रसाठी 35 लाख मंजूर झाले आहेत.तर गुळवंची उपकेंद्राचे काम प्रगतीपथावर आहे.दोन महिन्यात ते रुग्णाच्या सेवेत उपलब्ध होणार आहे. कुंभारी येथील उपकेंद्राला सुशोभीकरणासाठी 5 लाख,वाळेखिंडी उपकेंद्र सुशोभीकरणाला 4 लाख, कुंभारीतील पशुवैद्यकीय दवाखाना दुरुस्तीसाठी 3 लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत. 

राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या कुंभारी येथे सुसज्ज प्राथमिक आरोग्य केंद्र उभारणी होणे आवश्यक होते. शासनाच्या हे विचाराधीन होते पण जागेअभावी हे काम अडले होते. ही बाब जाधव दांपत्याच्या लक्षात येताच त्यांनी शासनाकडून जागा उपलब्ध करून घेण्यासाठी पाठपुरवा सुरू केला. जत तहसिल कार्यालय, जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त ते मंत्रालयापर्यत त्यासाठी पाठपुरावा केला. त्यांच्या या पाठपुराव्याला यश आले. शासनाने राष्ट्रीय महामार्गालगत शासनाच्या मालकीची असलेली साडेतीन एकर जमीन कुंभारी प्राथमिक आरोग्य केंद्राला दिली. तसे पत्रही जिल्हाधिकारी विजयकुमार काळम-पाटील जाधव दांपत्यांना दिले.

अत्याधुनिक प्रा.आरोग्य केंद्र उभारणार : अँड.प्रभाकर जाधव

कुंभारीसह परिसरातील नागरिकांच्या आरोग्याच्या सोयीसाठी हे प्राथमिक आरोग्य केंद्र उभारणीच्या कामास लवकरचं सुरूवात होणार आहे.परिसरातील रुग्णांना यांचा फायदा होणार आहे.त्याशिवाय राष्ट्रीय महामार्गालगत हे केंद्र होणार असल्याने अपघात सारख्या घटनेतील जखमीवर तातडीने उपचार होऊ शकणार आहेत.जागेअभावी काम अडले होती.तो प्रश्न आता मार्गी लागला आहे.केंद्रांच्या बांधकामासाठी पहिल्या टप्यासाठी 3 कोटी 70 लाखाचा निधी उपलब्ध झाला आहे. यातून केंद्राची इमारत,कंपाऊंड, वैद्यकीय व कर्मचारी निवासस्थान, उपगृह आदी कामे होणार आहेत.


 पाठपुराव्याला यश आले- स्नेहलता जाधव

कुंभारी सह परिसरातील जनतेच्या हितासाठी आमचे सतत प्रयत्न सुरू आहेत.जनतेच्या आरोग्याच्या तातडीच्या सेवेसाठी येथे प्रा.आ. केंद्र असणे आवश्यक होते.त्यासाठी सतत पाठपुरावा केला. या पाठपुराव्याला यश आले असून लवकरच सर्व प्रकिया पुर्ण झाल्यानंतर प्रत्यक्षात कामास सुरूवात होणार आहे.

कुंभारीत प्रा.आ.केंद्र उभारण्यासाठी महसूल विभागाने साडेतीन एकर जमीन दिली. त्याबाबतचे आदेश अँड.प्रभाकर जाधव,जि.प. सदस्या स्नेहलता जाधव यांच्याकडे देताना जिल्हाधिकारी विजयकुमार काळम-पाटील.

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here