उमदी | पिस्तूल बाळगल्याप्रकरणी दोघांना अटक,सशिंयत दोघे कवटेमहांकाळचे |

0
5

उमदी पोलीसाची कामगिरी

उमदी,वार्ताहर: उमदी (ता.जत) येथील बसस्थानक परिसरात अवैधरित्या पिस्तूल बाळगल्याप्रकरणी,राकेश मधुकर कदम(वय 32) रा.लांडगेवाडी (ता.कवठेमंकाळ) व रोहित अंकुश मंडले(वय 20)रा.खरशिंग (ता. कवठेमंकाळ) यांना सापळा रचून उमदी पोलिसांनी तीन पिस्तुलासह जिवंत काडतुसे असा एकूण दिड लाख(1,50,000) रुपये किमंतीची मुद्देमाल जप्त केला.

उमदी पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की,काही इसम विनापरवाना अवैधरित्या पिस्तूल बाळगत असल्याची माहिती खबर्‍यामार्फत उमदी पोलीस ठाण्याचे सपोनि भगवान शिंदे यांना मिळाली होती, त्यापार्वभूमीवर पोलीसांनी लावला होता.31 जानेवारी रोजी सायंकाळी साडेसात वाजता पायी पेट्रोलिंग करत असताना दोन तरूण सशिंयत शंकास्पद स्थितीत आढळल्याने त्यांच्याकडे चौकशी केली असता, गावठी बनावटीचे दोन्ही बाजूस प्लास्टिकचे काळे रंगाची पट्टी असलेले 3 पिस्तूल,स्टेनलेस स्टीलचे कव्हर असलेले तीन जिवंत काडतुसे आढळूंन आली. या पिस्तोल वरती मेड इन यू.एस.ए. अशी अक्षरे लिहिलेली आहेत.

दोघांना ताब्यात घेतले आहे.विनापरवाना ही पिस्तुले परिसरात विक्रीसाठी की अन्य काही कारणासाठी आणली आहे याचा शोध सुरू आहे.ही कारवाई पोलीस अधीक्षक सांगली यांच्या आदेशाने अप्पर पोलीस अधीक्षक सांगली व उपविभागीय अधिकारी जतचे अनिकेत भारती यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. कारवाईमध्ये दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांनाही उमदी पोलिसांनी अटक करून ताब्यात घेतले आहे.ही कारवाई सहाय्यक पोलिस निरीक्षक भगवान शिंदे,उपनिरीक्षक नामदेव दाडंगे, उपनिरीक्षक प्रवीण संपागे, पोलिस हवालदार बामणे, पोलिस हवालदार शिवाजी दिघे, पोलिस नाईक,सचिन आटपाडकर, पोलिस नाईक अर्जुन सगर, नितीन पलुस्कर यांनी संयुक्तपणे केली,अधिक तपास सचिन आटपाडकर करत आहेत.

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here