जत | नगरपालिकेतील सत्ताधाऱ्यांच्या विरोधामुळे 2 कोटीचा निधी पडून : उमेश सांवत |

0
5

सत्ताधारी गटातच पैसे मिळविण्यासाठी संघर्ष

जत,प्रतिनिधी : जत नगरपालिकेच्या जत मासिक सभेत सत्ताधारी गटाकडून मनमानी कारभार करत विरोधी पक्षाला डावलत निधी हडप करून विकास कामाला विरोध केला जात आहे.खा.संजयकाका पाटील व आ.विलासराव जगताप यांच्या प्रयत्नातुन मंजुर झालेल्या विकास कामाला ना हरकत प्रमाणपत्र देण्यासाठी सत्ताधारी मंडळींनी विरोध केल्याने दोन कोटीचा निधी पडून राहिला आहे. त्यामुळे शहरात विकास खोळंबला आहे,असा आरोप नगरसेवक उमेश सावंत यांनी पत्रकार बैठकीत केला.यावेळी विरोधी पक्ष नेते विजय ताड व भाजपचे नगरसेवक  उपस्थित होते. नगरपालिकेच्या मासिक सभेतच सत्ताधारी गटात कामे घेण्यावरून संघर्ष सुरू आहे.विरोधी सदस्यांना मतही मांडू दिले जात नाही.त्यामुळे नेमके सत्ताधाऱ्यांना करायचे काय आहे, हेच कळत नाही. शहरातील नगरपालिका हद्दील मुस्लिम समाजाच्या आरक्षित जागेवरील कपाऊंड,पेग्विन ब्लॉकसाठी 5 लाख ,प्रभाग 6 मधील साळेवस्तीसाठी आलेल्या 80 लाखाचा निधी नाहरकत पत्र न दिल्याने पडून आहे.त्याला नगरसेवक पट्टू गंवडी यांचा विरोध आहे.शहरात गेल्या तीन महिन्यापासून कचरा उचलला नाही, त्यामुळे घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे.दोन वेळा टेंडर काढून जाणीपूर्वक टेंडर मंजूर केले नाही.दुसऱ्याला जाते म्हणून स्वच्छता सभापतीने टेंडर रद्द केल्याचा आरोप सावंत यांनी केला. भाजी मंडईसाठी आरक्षित ठेक्यावरून सत्ताधारी नगरसेवकांत एकमेकांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रकार झाला.याप्रकरणी ठराव न घेतल्यास सभापती एडके यांनी बघून घेण्याची धमकी त्यांच्या गटातील नगरसेवकांना दिली.तरीही ठराव न घेतल्याने गंवडी यांच्या अंगावर फाईल फेकून दिली.

 करून स्वच्छता जोरदार विरोध केल्यामुळे ठराव घेतला तर बरं नाहीतर बघतोस अशी भाषा वापरली तरीही विरोध झाल्याने येडके आणि फाईल पटकावले यांच्यावर फेकून मारली यापूर्वी शौचालय दुरूस्तीवर  45 लाख 2017-18 मध्ये खर्च झाले असतानही नव्याने   निधी खर्च करण्याचा ठाव सत्ताधारी गटाकडून आखला आहे. शहरातील एका जमिनीच्या आर्थिक व्यवहाराच्या ना हरकत प्रमाणपत्रासाठी आठ लाख रुपयाचा व्यवहार झाल्याचा आरोप सांवत यांनी केला.नगरपालिकेत सत्ताधाऱ्यांना कोणताही विकास करायचा नाही.त्यांच्याच नगरसेवकांत ठराव घेण्यासाठी धमकीची भाषा वापरली जात आहे. शहराच्या अशा अडमुटेपणामुळे विकासकामे रखडली आहे.यापुढे कोणतीही बोगस कामे आम्ही करू देणार नसल्याचेही सांवत यांनी सांगितले.

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here