जत | म्हैसाळ कँनॉलची कुठेही फोडाफोडी,अधिकाऱ्यांचे नियत्रंण सुटले |

0
3

 शेतकरी आक्रमक

जत,प्रतिनिधी : म्हैसाळ सिंचन योजनेच्या कँनॉलची फोडाफोडी वाढली आहे.अनेक ठिकाणी बेफामपणे कँनॉल फोडले जात आहेत. म्हैशाळच्या अधिकाऱ्यांचे यावरचे पूर्णत: नियंत्रण सुटले असल्याचे त्यावरुन स्पष्ट होत आहेत.जत तालुक्यात दुष्काळाची तीव्रता कमी करण्यासाठी म्हैसाळ सिंचन योजनेतून हिवरेे ते सनमडी, डोर्ली ते डफळापूर व अंकले ते बिंळूरपर्यंत कॅनॉलमधून पाणी सोडले जात आहे.सर्वांना नियोजन करून पाणी सोडण्याचे काम अधिकाऱ्यांची जबाबदारी आहे.

मात्र, पाणीपट्टी भरूनही योग्य नियोजन नसल्याने शेतकऱ्यांना अपेक्षित पाणी मिळत नसल्याचे ओरड सुरू आहे.त्यामुळे नेमके सोडण्याच्या ठिकाणाहून इतत्रही सिंमेट प्लॉटर केलेले कँनॉल फोडले जात आहेत.प्रत्येक शेतकऱ्याला वेगवेगळी कारणे सांगितली जात आहेत. पैसे भरलेले शेतकरी पाणी सोडण्याच्या प्रतिक्षेत आहेत. यापूर्वीही अनेक शेतकऱ्यांनी पैसे भरून अपुरा पाणीपुरवठा झाला आहे. त्यांचीही पाणी मागणी आहे.नव्याने आलेले शेतकरी पाणी मागणी करत आहेत.बऱ्याच ठिकाणी पाणीपट्टी भरलेले शेतकरी प्रतिक्षेत आहे.त्यांना नियोजनानुसार पाणी सोडायचे आहे. मात्र ते सोडत असताना पाठीमागे अनेक ठिकाणी कँनॉलची फोडाफोडी केली जात आहे.

अधिकारी गुन्हे दाखल करण्याचे सांगत असतानाही असे प्रकार घडत आहेत.नेमके हे कुणाच्या पाठिंब्याने होते आहे, असाही प्रश्न उपस्थित होत आहे.प्रत्येक ठिकाणी अमुक अधिकाऱ्याने आम्हाला सांगितल्याने कँनॉल फोडला असे सांगितले जात आहे.त्यामुळे नेमके पाणी कुणाला द्यायचे,कुठे सोडायचे आणि कुणी घ्यायचे याचे कोणतेही नियोजन नसल्याने प्लास्टर केलेल्या कँनॉलच्या फोडाफोडीने लाखो रुपयांचे नुकसान होत आहे.त्याशिवाय लाखो लिटर पाणीही वाया जात आहे.राजकीय वरदहस्त व अधिकाऱ्यांच्या साटेलोटे पणामुळे बेफाम पाणी कुठेही सोडले जात आहे.यावर नियंत्रण आणावे अशी मागणी होत आहे.

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here