जत | 2 दरोडेखोरांच्या मुसक्या आवळल्या, माडग्याळ छाप्यातील फरारी संशयित |

0
9

जत, प्रतिनिधी : सांगली जिल्ह्यात धुमाकूळ घातलेल्या आंतरराज्यीय दरोडेखोरांच्या टोळीतील दोघांच्या मुसक्या स्थानिक गुन्हे विभागाच्या स्पेशल टास्क फोर्स पथकाने आवळल्या.शंकर अनिल गायकवाड, वय-21 व त्यांचा भाऊ रमेश उर्फ नामदेव गायकवाड, वय-20,(दोघे रा.सोरडी, ता.जत, सध्या रा.हनुमान नगर, 2 री गल्ली सांगली)असे त्यांचे नाव आहे.

संशयित माडग्याळ दरोड्यातील फरारी संशयित आहेत. त्यांनी जत तालुक्यातील शेगाव, संख, कुंभारी, बिळूर, डफळापूरसह 12 चोऱ्या, दरोडे टाकल्याचे उघडकीस आले आहे.

यापूर्वी या अंतरराज्य टोळीतील मंजुनाथ गुरुनाथ पेर्णेकर रा.रायबाग (कर्नाटक),शिवाजी उत्तम काळे, रा.गडमुडशिंगी (जि. कोल्हापूर), तात्या उर्फ नामदेव आप्पा चव्हाण (रा.घाटरस्ता मिरज, ता.मिरज),दत्ता रामा चव्‍हाण, दिगंबर रामा चव्‍हाण,बादल रमेश चव्हाण, आकाश आप्पा चव्हाण सर्व रा.उमराणी रोड तांडा,जत यांना अटक केली आहे.

त्यांनी सांगली, सोलापूर व कर्नाटक येथे घरफोडी व दरोड्याचे गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यांच्याकडून या गुन्ह्यातील मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.त्यांचे अन्य काही साध्या फरार झाले होते.त्यांच्या शोधासाठी स्पेशल टास्क फोर्स नियुक्त केली होती.महिन्यापुर्वी जत तालुक्यासह जिल्ह्यात दरोडेखोरांच्या आंतरराज्य टोळीने अनेक दरोडे टाकले होते. उमदी हद्दीतील माडग्याळ येथील बियरबारवर दरोडा टाकून दारूच्या बॉटल चोरून पलायन केले. या टोळीला स्थानिक विशेषण पथकाने पाठलाग करून पकडले होते. त्यावेळी सात जणांच्या मुसक्या पोलिसांनी आवळळ्या होत्या. अंधाराचा फायदा घेत शंकर गायकवाड याने पलायन केले होते. त्याच्या मागावर पोलिस होते.

दरोडेखोर सांगली येथे राहत असल्याचे पोलिसांना खबऱ्याकडून कळाले होते.स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीकांत पिंगळे, सहा. पोलीस निरीक्षक विशाल पाटील यांच्या पथकाने सांगलीतील हनुमान नगर येथे छापा टाकला. त्यात शंकर गायकवाड व त्याचा भाऊ रमेश उर्फ नामदेव गायकवाड यांना पकडण्यात आले.त्यांच्याकडून 6,430 रूपयांचा मुद्देमाल मिळून आला. गायकवाड यांने कुरळप येथील सुशीला कांबळे यांच्या घरावर 17/5/2018 रोजी दरोडा टाकला होता. या टोळीने 20/ 9 /2018 रोजी दीपक तुकाराम शिंदे रा. यमगर वस्ती यांच्या दरोडा टाकून सहा तोळे सोने, रोख रक्कम लंपाक केली होती. शंकर गायकवाड व रमेश गायकवाड व त्यांच्या साथीदारांनी मिळून हा गुन्हा केला होता.

या टोळीने अजय पवार रा.खानापूर यांचा भाग्यश्री बियरबार फोडून दोन लाख दोन हजार एकशे नव्वद रुपये किमतीचा मुद्देमाल, किरण रमेश कलाल यांचे बिंळूर येथील देशी दारूचे दुकान फोडून 94 हजार 838 रुपये किमतीची दारू, हनुमंत बिरा सोनलकर यांच्या मालकीचे देशी दारूचे दुकान फोडून 1 लाख 17 हजार 68 रुपये किमतीचे दारूचे बॉक्स, व संख, जत,माडग्याळ येथील देशी-विदेशी दारूची दुकाने फोडून चोरी केली होती.

ढांलगाव येथील सिद्धेश्वर जनार्दन भोसले यांचे सोन्या-चांदीचे दुकान फोडून 68 हजार पाचशे रुपयेचा मुद्देमाल, कुंभारी येथील डॉ. तंगडी यांच्या घरी घरफोडी करून तीन लाख 22 हजार शंभर रुपयेचा मुद्देमाल, अर्जुन रामचंद्र पाटील रा. बाज यांचे डफळापूर येथील मोरया किराणा दुकान फोडून 65 हजार 100 रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला होता.याप्रकरणी या आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. याशिवाय त्यांच्या अन्य साथीदारांचा शोध सुरू आहे.

सांगली,सोलापूर कोल्हापूर जिल्ह्यातील तसेच कर्नाटक राज्यातील अनेक गुन्हे या टोळीकडून उघड होण्याची शक्यता आहे.पोलीस अधीक्षक सहील शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली स्पेशल टास्क फोर्स पथकाचे पोलीस निरीक्षक श्रीकांत पिंगळे,सहा. पोलीस निरीक्षक विशाल पाटील, पोलीस कर्मचारी जितेंद्र जाधव, राजेंद्र मुळे, राजू शिरोळकर, अनिल कोळेकर, राहुल जाधव, संजय पाटील, सागर लवटे, संदीप नलावडे संदीप गुरव, अमित परीट, विकास भोसले, शशिकांत जाधव, संजय कांबळे,किशोर काबुगडे, अरुण सोकटे, सचिन सूर्यवंशी यांनी ही कारवाई केली.

याप्रकरणी पोलिसांनी दरोडेखोरांना जत न्यायालयात उसे केले असता 4 फेंब्रुवारीपर्यंत पोलीस कस्टडी सुनावली.

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here