उमदी,वार्ताहर:उमदी(ता.जत)येथे “संघर्ष बहुउद्देशीय समाज विकास संस्था” या संस्थेचे उद्घाटन ग्रामपंचायतीचे माजी सदस्य सुरेश कुल्लोळी यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
यावेळी कुल्लोळी म्हणाले, वंचित समाजाचा विकास करण्याच्या हेतूने संघर्ष बहुउद्देशीय सेवा संस्थेची आम्ही स्थापना केली आहे, या संस्थेच्या माध्यमातून ग्रामीण वंचित लोकांच्या आर्थिक,सामाजिक, शैक्षणिक विकासासाठी कटिबद्ध आहोत. सर्व समाजातील लोकांना एकत्रित ठेवण्याचा आमचा हेतू आहे. त्यादृष्टीने आम्ही या ठिकाणी ही संस्था उभी केली आहे.संस्थेच्या या मध्यवर्ती कार्यालयातून यापुढे कामकाज चालणार आहे.माजी ग्रामपंचायत सदस्य निवृत्ती शिंदे,रमेश हाळके,बंडा शेवाळे, मनसिद्ध पुजारी,रवी शिवपुरे, संतोष आरकेरी,सुनील पोतदार, संगम ममदापूरे,यलप्पा तोरणे, विजय हिरेमठ, केशव पाटील आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
उमदी ता.जत येथील संघर्ष बहुउद्देशीय समाज विकास संस्थेचे उद्घाटन प्रंसगी उपस्थित मान्यवर