अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन च्या प्रतिक चिन्हाचे अनावरण

0
1

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या ९९ व्या नाट्य संमेलनाच्या प्रतिक चिन्हाचे मा. ना. श्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या हस्ते अनावरण.

९९ वे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन नागपूर येथे फेब्रुवारी मध्ये २२, २३, २४, आणि २५ या तारखेला होणार आहे. ३४ वर्षा पूर्वी म्हणजेच १९८५ साली नटवर्य प्रभाकर पणशीकर ह्यांनी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष पद भूषवले होते. आणि आता ९९ व्या नाट्यसंमेलनाचे अध्यक्ष नाटककार श्री प्रेमानंद गज्वी हे आहेत.

महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस ह्यांच्या शुभ हस्ते नाट्य संमेलनाच्या प्रतिक चिन्हाचे { LOGO } अनावरण नुकतेच नागपूर येथे करण्यात आले. ह्या प्रसंगी नाट्य परिषदेचे मुंबईचे उपाध्यक्ष [ उपक्रम ] श्री नरेश गडेकर, नागपूर येथील स्वागत समितीचे संयोजक श्री संदीप जोशी, प्रमुख निमंत्रक श्री प्रफुल्ल फरकसे, स्वागत समितीचे सरचिटणीस श्री किशोर आयलवार हे उपस्थित होते. मा. ना. श्री नितीन गडकरी केंद्रीय मंत्री, भारत सरकार, हे या नाट्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष असून मा श्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या मार्गदर्शनात हा नाट्य संमेलनाचा सोहळा होणार आहे. जागतिक कीर्तीचे नाटककार प्रा. महेश एलकुंचवार हे नाट्य संमेलनाचे उद्घाटक आहेत. अ.भा.म.नाट्य परिषद मध्यवर्तीच्या सहाय्याने आणि अध्यक्ष मा श्री नवनाथ [ प्रसाद ] कांबळी यांच्या मार्गदर्शनात तसेच उपक्रम उपाध्यक्ष श्री नरेश गडेकर यांच्या सहयोगाने नाट्य संमेलनाची तयारी सुरु आहे. कार्याध्यक्ष डॉ गिरीश गांधी, संयोजक श्री संदीप जोशी, समन्वयक श्री प्रवीण दटके यांची स्वागत समिती संमेलन यशस्वी करण्यासाठी जोमाने कार्य करीत आहेत.

दीनानाथ घारपुरे,९९३०११२९९७

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here