डफळापूर | जि.प.मुलींच्या शाळेची क्षेत्रभेटीअतर्गंत म्हैसाळ कँनॉलला भेट |

0
1

डफळापूर, वार्ताहर : डफळापूर ता.जत येथील जि.प.मुलींच्या शाळेमध्ये शिक्षण पूरक 

उपक्रमाअंतर्गत क्षेत्रभेटीचे आयोजन करण्यात आले.गावाच्या पश्चिमेला असणाऱ्या 

म्हैसाळ कँनॉलमधून तलावाकडे मागील दहा दिवसापासून पाणी वाहत आहे. विद्यार्थ्यांना कँनॉल केंव्हा,शेतीचा पाठ ह्या काय संकल्पना असतात.हे समजावून देण्यासाठी येथील शाळेचे शिक्षक व एसएमसी अध्यक्ष,उपाध्यक्ष व सदस्य यांच्या संकल्पनेतून क्षेत्रभेटीचे आयोजन केले.पाणी कुठून आले आहे,त्याचा प्रवाह कसा आलाय हे सर्व विद्यार्थ्यांना समजावून सांगण्यात आले. तसेच पोपट पुकळे यांच्या पुकळे उद्योग समूहातील वृंन्दावन अँग्रो इंडस्ट्रीजच्या डाळी निर्मिती,पशुखाद्य व मका चुणी प्रक्रिया कारखाना दाखवण्यात आला. यावेळी कारखान्याची माहिती श्रीनिवास व अनिरुद्ध पुकळे यांनी दिली. त्यांच्याच शेतामध्ये असणारे फणसाचे झाड फक्त कोकणातच पाह्याला मिळते ते सुद्धा विद्यार्थ्यांना क्षेत्रभेटीमध्ये दाखविण्यात आले. लेक शिकवा लेक वाचवा अंतर्गत शेतकऱ्यांची मुलाखत घेतली.केंद्रप्रमुख शंकर बेले,मुख्याध्यापिका रेखा कोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सदर क्षेत्रभेटीचे आयोजन करण्यात आले. क्षेत्रभेटीचे नियोजन अजंता लोंढे,शंकर कुंभार,आरती कांबळे,उद्योगरत्न संकपाळ,जयश्री मगदूम, मनीषा शिंत्रे यांनी केले.

डफळापूर जि.प.मुलींच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी क्षेत्रभेटीअतर्गंत म्हैसाळ कँनॉलला भेट दिली.

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here