जत,प्रतिनिधी : जत तालुक्यातील शेतकऱ्यांना म्हैसाळ सिंचन योजनेतून पाणी मिळावे यासाठी माजी सभापती प्रकाश जमदाडे प्रयत्न करत आहेत.असे असताना प्रभाकर जाधव यांनी बिनबुडाचे आरोप करत जमदाडे यांना बदनाम करण्याचा उद्योग चालवला आहे,तो त्याने बंद करावा अन्यथा तालुक्यात त्यांना तालुक्यात फिरू देणार नाही,असा इशारा येळवीचे माजी सरपंच मच्छिंद्र खिल्लारे,रघुनाथ जमदाडे,बाळासाहेब शिंदे,यांनी दिला.
वास्तविक पाहता तालुक्यातील गुळवंची येथील शेतकऱ्यावर दाखल झालेले गुन्हे हे जिल्हाधिकारी यांनी 10 जानेवारीपासून लावलेल्या 144 कलमामुळे दाखल झाले आहेत.त्यात कोणत्याही प्रकारे जमदाडे यांनी सांगण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.कुणीही सांगून गुन्हे दाखल होत नाहीत.
तालुक्यात कँनॉल पुर्ण झालेल्या सर्वच ठिकाणी पाणी पोहचावे यासाठी खासदार संजयकाका पाटील,आमदार विलास जगताप याच्यांबरोबर जमदाडे प्रयत्नशील आहेत.ते मंगळवेढ्याला पाणी देण्यासाठी कधीही खासदारांना भेटलेले नाहीत.शिंष्टमंडळ वैगेरे हे थोताड आहे.जमदाडे यांनी आमदारांसोबत उपोषण करण्याचा इशारा दिल्यानंतर येळवी तलावात पाणी सोडले आहे.त्यातही जाधव यांनी गुळवंचीच्या काही शेतकऱ्यांना फुस
लावून कँनॉल फोडायला लावले, प्रकरण अंगलट येतयं म्हणून त्यांनी पळ काढला.असे करायला ते काय पाटबंधारे अधिकारी आहेत काय?असाही आरोप यावेळी करण्यात आला.भविष्यात जाधव यांनी असे आरोप बंद करावेत,अन्यथा त्यांना परिणाम भोगावे लागतील असा इशारा यावेळी देण्यात आला.यावेळी लिंबाजी सोनलकर,सांरग सर्वे,बिरजाप्पा रुपनूर,अनिता खुळपे,सागर व्हनमाने उपस्थित होते.