डफळापूर, वार्ताहर : डफळापुर ता.जत येथील ग्रामपंचायतीच्या चौदाव्या वित्त आयोगाच्या शैक्षणिक निधीतून पाच प्राथमिक शाळांना लॅपटॉप व 12 अंगणवाडीतील विद्यार्थ्यांना ड्रेसचे वाटप करण्यात आले.शाळांचा दर्जा सुधारावा विद्यार्थ्यांना अत्याधुनिक सेवा मिळाव्यात या उद्देशाने हे वाटप करण्यात आले आहे. जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना याचा उपयोग होणार आहे. यावेळी सरपंच बालिका चव्हाण,उपसरपंच प्रतापराव चव्हाण, विठ्ठल छत्रे,बाबासाहेब माळी,मुरलीधर शिंदे,देवदास पाटील,राहुल पाटील,सुनील गायकवा, अजित खतीब,विजय माळी सतीशा चव्हाण,रेश्मा शिंदे,पवित्रा हताळे,नंदाताई गावडे,जयश्री बोराडे,मालन गडदे,सावित्री दुगाणे,कमल संकपाळ, प्रा.बी.आर.पाटील, परशुराम चव्हाण सर,ग्रामसेवक सुनील कोरे केंद्रप्रमुख श्री.बेले व सर्व शाळांचे मुख्याध्यापक यावेळी उपस्थित होते.
डफळापूर ग्रामपंचायतीच्या वतीने शाळांना लॅपटॉप व ड्रेसचे वाटप करताना संरपच बालिका चव्हाण व पदाधिकारी