जाड्डरबोबलाद | येथील शाळकरी विद्यार्थ्यास मारहाण प्रकरण तापले | भाजपचे आ.जगताप,सभापती रवीपाटील गट आमनेसामने

0
5

जत,प्रतिनिधी : जत तालुक्यातील जाड्डरबोबलाद येथील शाळकरी विद्यार्थ्याला मारहाण प्रकरणनाने राजकीय वळण घेतले आहे.भाजपा आमदार विलासराव जगताप व सभापती तम्माणगोंडा रवीपाटील यांच्या समर्थकांनी एकमेकावर आरोप केले आहेत.तर याबाबतची तक्रार दाखल करण्यासाठी दोन्ही गटाकडून उमदी पोलीसात शक्तीप्रदर्शन करत गुन्हे दाखल करण्यासाठी पोलीसावर दबाब टाकला आहे.दोन्ही गटाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.दरम्यान दोन्ही गटाच्या वादामुळे गावात तणाव असून नागरिक दहशतीखाली आहेत.

जाड्डरबोबलाद येथील गजानन शिक्षण संस्थेच्या 12 वीच्या वर्गातील धरेप्पा गुरनिंगप्पा मुंचडी या विद्यार्थ्यांने सभापती रवीपाटील विरोधात बोलले म्हणून त्यांच्या संस्थेतील शिक्षकांनी मारहाण करत अपमान करत शिवीगाळी केली.त्यामुळे त्याला धक्का बसला.अपमानाच्या त्राग्याने त्यांने आत्महत्या करणार आहे, असा मजकूर लिहलेली चिठ्ठी ठेवून घरातून गायब झाला आहे. राजकारणात विरोध करतोय म्हणून विद्यार्थ्याला गंभीर मारहाण केल्याचा आरोप आमदार जगताप गटाकडून करण्यात आला आहे. खुद्द आ.जगताप उमदी पोहचत पोलीस ठाण्यात धरणे धऱत रवीपाटील वर कारवाईची मागणी केली आहे.

तर रवीपाटील गटाकडून धरेप्पा मुचंडी यांने,मुख्याध्यापक व शिक्षकांना शिवीगाळ करत मारहाण केली केली,अर्वाच्च भाषा वापरल्याने शिक्षकांनी फक्त समजावून सांगण़्याच्या प्रयत्न केला.त्याला गंभीर मारहाण करण्याचा कोणताही प्रश्न नाही.फक्त रवीपाटील यांनी आ.जगताप यांच्यावर केलेल्या आरोपामुळे आमदार सह समर्थकांनी रवीपाटील यांच्यावर बिनबुडाचे आरोप केले आहेत.पोलीसांनी दोन्ही बाजूचे म्हणणे ऐकत शनिवारी गुन्हा दाखल करण्याची कारवाई केली.दरम्यान रवीवारी सभापती तम्माणगोंडा रवीपाटील यांनी जाड्डरबोबलाद ते उमदी पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला.शाळेत 

धरेप्पा गुरनिंगप्पा मुंचडी यांने मुलीच्या स्वच्छतागृहात जाण्याचा प्रयत्न केला.त्याला विरोध करणाऱ्या मुख्याध्यापकावर अंगावर धावून जात त्यांचा शर्ट फाडला.असे गैरवर्तन

करणाऱ्या विद्यार्थ्याला शिक्षा केली म्हणून शिक्षणासारख्या मंदिरावर आमदारांनी राजकारण करत बेताल आरोप करून शिक्षकावर गुन्हे दाखल करायला लावणे त्यांना अशोभनीय आहे.त्यांचा निषेध करून सभापती रवीपाटील यांनी विद्यार्थी व त्यांच्या पालकाविरोधात पोलीसात तक्रार दिली.

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here