जत | म्हैसाळ पाण्यासाठी एंकुडीकरांचा निवडणूकीवर बहिष्कार ; ग्रामसभेत महत्त्वपूर्ण ठराव |

0
4

जत,(प्रतिनिधी):कायम दुष्काळी असणाऱ्या जत तालुक्यातील एकुंडी गावाकडे 

जिल्हा,तालुक्यातील लोकप्रतिनिधींनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले असून येत्या लोकसभा निवडणूकी अगोदर एकुंडीला म्हैसाळ योजनेचे पाणी सोडावे अन्यथा म्हैसाळ योजनेतून पाणी येईपर्यंत येणाऱ्या सर्व निवडणूकीवर बहिष्कार घालण्याचा महत्वपूर्ण ठराव प्रजासत्ताक दिनी झालेल्या ग्रामसभेत सर्वानुमते घेण्यात आला.ग्रामपंचायतीची ग्रामसभा सरपंच तथा सरपंच परिषदेचे तालुका अध्यक्ष बसवराज पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.एंकुडी देश स्वतंत्र झाल्यापासून सिंचन योजनेपासून वचिंत आहे.शेतीला पाणी नसल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत आला आहे. कोणतीही पिके ठोस पाणी नसल्याने व्यवस्थित येत नाहीत. सततचे अवर्षणाने पिण्याच्या पाण्यासाठी दरवर्षी टँकर लावावा लागतो.यंदाची परिस्थिती भिषण आहे.आताच  तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली आहे.जनावरांच्या चाऱ्याचाही प्रश्न गंभीर बनला आहे.म्हैसाळचे पाणी सोडल्यास यातून शेतकरी,नागरिकांची सुटका होणार आहे. एंकुडीसाठी म्हैसाळच्या बिंळूर कालव्यातून पाणी देण्याचे नियोजन आहे.बिंळूर,डफळापूर परिसरात सध्या पाणी आले आहे. त्यामुळे एंकूडीला गतीने पाणी देणे शक्य आहे.जलसंपदा विभागाने त्यासाठी लवकरात लवकर नियोजन करून पाणी सोडावे अशी मागणी ग्रामसभेत करण्यात आली.यावेळी उपसरपंच सरोजनी कोरे, सोसायटी चेअरमन श्रीमंत गुड्डोडगी, व्हा.चेअरमन मलगोंडा हेळकर, माजी सरपंच बशेट्टी कोट्टलगी, बाबाण्णा नाईक, मलगोंडा नाईक, महादेव कोट्टलगी, हणमंत कांबळे यांच्या सह ग्रामपंचायत सदस्य व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

गावचा समतोल विकास करायचा असेलतर म्हैसाळ सिंचन योजनेचे पाणी महत्वाचे आहे. त्यामुळे पाणी येईपर्यत आता यापुढे आमचा लढा राहिल.गावाला सुजलाम् सुफलाम् करण्यासाठी सर्व शक्ती पणाला लावू.– बसवराज पाटील 

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here