जत,प्रतिनिधी : बिंळूरसाठी पाणी सोडण्यासाठी घाईगडबडीत कँनॉलचे काम करण्यात आले आहे. त्यातून गुरूवारी सकाळी 9 वाजता सोडलेले पाणी शुक्रवारी सायकांळी खलाटी पंपहाऊसमध्ये पोहचले आहे. तब्बल पन्नास वर्षापासून मागणी असलेले पाणी बिंळूरकरांना येत्या दोन-तीन दिवसात मिळणार आहे.त्यामुळे कँनॉल इतर ठिकाणी फोडू नयेत यासाठी बिंळूरचे लोकप्रतिनिधी,सुमारे 100 शेतकऱ्यांनी गुरूवारपासून कँनॉलवरर्ती जागता पहारा दिला आहे. तो यापुढे पाणी असेपर्यत कायम राहणार आहे.
देवनाळ कॉलव्याच्या दोन पंपहाऊसमधून पाणी बिंळूमध्ये पोहचणार आहे.अंकले पंपहाऊस ते जत-सांगली रोडपर्यत पाणी येईपर्यत तब्बल 25 तासाचा अवधी लागला.त्यापुढे खलाटी पंपहाऊसमधून मोठ्या पाईपमधून गतीने पाणी बिंळूरकडे सरणार आहे.बिंळूरमध्ये पाण्याच्या स्वागताची जंगी तयारी करण्यात आली आहे.मात्र या पाणी सोडण्याच्या दरम्यान कँनॉल कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.कँनॉल खोदनाताना बाजूच्या मातीचे मजबूतीकरण व्यवस्थित न झाल्याने 25 तासात सोडलेल्या पाण्यातील 50 टक्के पाणी कँनॉलमध्ये लिकेज व मुरल्याने इतत्र गेले आहे.पाण्याच्या चोरीसाठी शेतकऱ्यांवर गंभीर गुन्हे दाखल करणाऱ्या म्हैसाळ योजनेच्या अधिकाऱ्यांवर ही पाणी भरपाई कुणाकडून घ्यायचे असा प्रश्न पडला असल्याची चर्चा आहे. तर याबाबत आता कुणावर गुन्हा दाखल कराया असाही विषय चर्चेला जात आहे.
खलाटी ता.जत कडे जाणाऱ्या पंपहाऊसला कँनॉलमधून पाणी पुढे जात आहे.