जत,प्रतिनिधी : जत तालुक्याच्या हक्काचे म्हैसाळ पाणी योजनेचे पाणी मंगळवेढ्याला देण्याचा घाट
भाजप नेते प्रकाश जमदाडे यांनी घातला आहे.तालुक्यातील शेतकरी पाण्यासाठी टाहो फोडत असताना असे प्रकार निषेधार्थ आहेत.जमदाडे यांच्यामुळेच कँनॉल फोडल्याप्रकरणी शेतकऱ्यांवर सराईत गुन्हेगाराप्रमाणे गंभीर गुन्हे दाखल झाले असल्याचा आरोप अजिक्यतांरा प्रतिष्ठानचे अध्यक्ष अँड.प्रभाकर जाधव यांनी पत्रकार बैठकीत केला.
जत तालुक्यात म्हैसाळचे पाणी मिळावे म्हणून पाणीपट्टी भरून शेतकरी पाण्याची वाट पाहत आहेत.त्यांना पाणी देण्यासाठी अधिकाऱ्यांकडून टाळाटाळ केली जात आहे.त्यामुळे वैतागलेल्या शेतकऱ्यांकडून पाणी मिळाले नाही,म्हणून कँनॉल फोडण्याचे प्रकार झाले आहेत.ते चुकीचे आहेत.मात्र त्यांच्यावर 353 सारखे गंभीर गुन्हे दाखल केले जात आहेत.त्यालाही जमदाडे यांचा छुपा पांठिबा आहे.त्यापलिकडे जात जतला वगळून मंगळवेढ्याला पाणी देण्यासाठी त्यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. जतचे शेतकऱी सोडून इतर तालुक्यात पाणी देणे म्हणजे जतच्या शेतकऱ्यांवर अन्याय आहे.जमदाडे यांनी मंगळवेढाची वकिली करण्याचा उद्योग बंद करावा असा आरोप जाधव यांनी केला.