जत | शेतकरी सराईत गुन्हेगार आहेत काय? | विक्रम सांवत यांचा सवाल

0
23

 ठरलेले पाणी द्या,कँनॉल फोडायचा प्रश्न येत नाही

जत,प्रतिनिधी : जत तालुक्यात म्हैसाळ सिंचन योजनेतून पाणी सोडले जात आहे. ते कौतुकास्पद आहे,मात्र पाणी घेतले म्हणून तालुक्यातील शेतकऱ्यांवर सराईत गुन्हेगारासारखे गंभीर गुन्हे दाखल करण्याचा प्रकार थांबवा अन्यथा आम्हाला शेतकऱ्यांच्या संरक्षणासाठी रस्त्यावर उतरावे लागेल असा इशारा मनमानी करक गरीब शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल करणाऱ्या अधिकाऱ्यांना कॉग्रेस नेते विक्रम सांवत यांनी दिला.तालुक्यात म्हैशाळ योजनेचे पाणी घेण्याच्या कारणावरून पाटबंधारे विभागाचे अधिकारी शेतकऱ्यांवर आणि काँग्रेस कार्यकर्तेवर गंभीर गुन्हे दाखल करीत आहेत.वास्तविक शेतकरी पैसे भरत असतानाही त्यांना ठरलेले पाणी न देता गुन्हे दाखल केले जात आहेत. आहे.सांवत यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हंटले आहे की,तालुक्यात यंदा अभूतपूर्व दुष्काळ पडला आहे.लोक पाण्यासाठी टाहो फोडत आहेत.म्हैशाळ आवर्तनाचे पाणी पश्चिम व दक्षिण भागात आले आहे.परंतु या पाणी वाटपातही दुजाभाव होत आहे.सत्ताधारी भाजपचे लोक दांडगावशाहीने पाणी फोडत आहे.तसेच ज्या लोकांनी पैसे भरले नाहीत त्यांनीही पाण्याचा वापर सुरु केला आहे.शिवाय पाणी पोचलेल्या अनेक गावात विनाकारण काँग्रेस कार्यकर्त्ये व  शेतकऱ्यावर गुन्हे दाखल करण्याचे काम केले जात आहे.हा प्रकार चुकीचा आहे.वास्तविक आम्ही पाण्याचे पैसे भरण्यास तयार आहोत.लोकांनी डीडी काढले आहेत, पण पाणी मिळत नाही.याउलट भाजपचे पदाधिकारी मनमानीने पाणी फोडत आहेत.दुसरीकडे गुन्हे मात्र कॉग्रेसच्या कार्यकर्त्यांवर दाखल केले जात आहेत.हा प्रकार आम्ही खपून घेणार नाही. प्रशासनाने सत्तेच्या दबावाला बळी न पडता दुष्काळात सर्वाना समान पाणी वाटप केले पाहिजे.जर शेतकरी कार्यकर्ते आणि जनतेवर अन्याय होणार असेल तर आपण शांत बसणार नाही.जत च्या दुष्काळात आम्ही जनते सोबत आहोत.अन्याय झाल्यास रस्त्यावर उतरून आंदोलन करू असा इशारा विक्रमसिंह दादा सावंत यांनी दिला आहे.

तुबचीचे पाणी केव्हाच आले असते

 जत तालुक्यात तुबची-बबलेश्वर योजनेसाठी आपण दहा वर्षा पासून काम करीत आहोत. आघाडी सरकारच्या काळात या कामाच्या सर्वेसाठी पैसे मंजूर केल्यामुळे या योजनेचा आरखडा तयार झाला आहे.आम्ही त्या वेळीसुध्दा कर्नाटकला पाणी सोडताना जत तालुक्यास पाणी सोडण्यास अट घातली होती. मागच्या सरकारच्या काळात असा निर्णयही झाला आहे.आज या योजनेचे पाणी जत तालुक्यात सिमेवर आले आहे.हे पाणी नैसर्गिक प्रवाहातून जतला आणने सोपे आहे.पाणी आल्यानंतर योजनेचे महत्व भाजपला समजले आहे.आत्ता हेच लोक पाण्यासाठी एकत्रित येऊन पाठपुरावा करण्या पेक्षा गटातटाने राजकारण करीत आहे.वास्तविक भांडत बसण्यापेक्षा एकोप्याने लढला तर किमान पाणी येईल तसेच या योजनेसाठी विक्रम सांवत वेळ वेळी योजने साठी पाटपुरावा करीत होतो.तेव्हा देखील या लोकांनी साथ दिली नाही. उलट आमची खिल्ली उडवली जर त्याचवेळी एकत्रित आला असता,तर आज तुबची योजनेचे पाणी 42 गावांना मिळाले असते. पण आज हे भाजपचे लोक केवळ राजकारणातून या योजनेकडे पहात आहेत असा आरोप विक्रम सावंत यांनी केला.पूर्व भागातील 42 गावांना पाणी आणल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नसल्याचेही स्पष्ट केले आहे.

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here