पाणी बघून सर्वत्र अलबेल असल्याचा साक्षात्कार
जत,प्रतिनिधी : जत तालुक्यातील पश्चिम व दक्षिण भागात महत्वकांक्षी म्हैसाळ सिंचन योजनेची कामे गतीने सुरू आहे.प्रत्येक ठिकाणी आमच्या गावात कधी पाणी येईल याकडेच सर्व नेते लोकप्रतिनिधी,शेतकरी व जनतेचे लक्ष आहे.बर्याच ठिकाणी पाणी पोहचले आहे. मात्र हे होताना योजनेच्या कँनॉल,पुले,पंपहाऊस आदी कामाच्या दर्जाकडे पुर्णत: दुर्लक्ष होत आहे.गतीने कामे करण्याच्या व उद्घाटनाच्या धांदलीत अधिकारी व ठेकेदाराकडून कामाच्या दर्जाकडे कानडोळा होत आहे. सध्या सगळीकडे कामे होऊन पाणी येताना दिसत आहे.मात्र कँनॉलसह झालेल्या इतर कामाचे लाईफ कितीकाळ टिकेल याबाबत मात्र प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.अनेक शेतकऱ्यांवर अन्याय करत अधिकाऱ्यांनी कँनॉल काढले आहेत.अनेक बड्या शेतकऱ्यांची जमीन वाचविण्यासाठी गरीब शेतकऱ्यांच्या जमिनीतून कँनॉल घालविले आहेत.अशाने काही शेतकरी जमीनदारांचे बेघर झाले आहेत.बऱ्यांच ठिकाणी अधिकाऱ्यांच्या सोयीनुसार कँनॉलची कामे झाल्याचे आरोप आहेत.यात आर्थिक तडजोड झाल्याचीही चर्चा आहे.त्याशिवाय कँनॉल बांधकामाकडे सर्वाचे पुर्णत:दुर्लक्ष झाले आहे.जिकडे तिकडे पाणी आल्याचे सुखद चित्र कँनॉलचे काम करणाऱ्या अधिकारी, ठेकेदारांना खुले मैदान सोडले आहे.घाईघाईत कामे आटोपण्याच्या नादात कामे दर्जाहीन होत असल्याचे आरोप आहेत.मात्र अशी तक्रार करणाऱ्या शेतकरी लोकप्रतिनीधीचा आवाज अधिकाऱ्यांच्या फळीने मोडून काढला आहे.मुख्य सर्व्हे सोडून अनेक ठिकाणी सोयीनुसार कँनॉल घातल्याचे काही शेतकऱ्यांचे आरोप आहेत.या सर्व कामाची त्रयस्थ उच्चस्तरीय अधिकाऱ्यांकडून तपासणी व्हावी अशी मागणी होत आहे.
पैसे भरलेल्या शेतकऱ्यांना पाणी मिळेना
कँनॉल पुर्ण झालेल्या शेतकऱ्यांनी कर्जे,व्याजाने पैसे काढून पाणी येणार म्हणून पाणीपट्टी भरली आहे.मात्र त्यांना पाणी सोडण्याच्या निश्चित केलेल्या दिवसाअगोदरच पाणी बंद केले आहे. अपेक्षित पाणी न आल्याने काही शेतकऱ्यांच्या पिकांनाही पाणी देऊ शकले नाहीत.अधिकाऱ्यांच्या सोयीनुसार येथेही पाण्याचे नियोजन केले जात आहे. परिणामी शेतकरी कँनॉल फोडू लागलेत.त्यांच्यावर कायद्याची धमकी देत या अधिकाऱ्यांनी गंभीर गुन्हे दाखल करण्याचा सफाटा लावला आहे.वास्तविक सर्वांना पाणी मिळणे गरजेचे आहे. मात्र जेवढे पाणी देण्याचे नियोजन आहे.तेवढे पाणी देणे ही अधिकाऱ्यांची जबाबदारी आहे.मात्र ते मनमानी करत असल्याचे आरोप आहेत.