बनाव उघड
संख,वार्ताहर : कोंतेबोबलाद (ता.जत)येथील सायकल दुकानदार शहानूर ख्वाजासाब मकानदार (वय-25) यांचा अनैतिक संंबधाच्या कारणावरून महिलेने गळाआवळून खून केल्याचे स्पष्ट झाले आहे.याप्रकरणी ललिता मारूती मचंद(वय-39,रा.कोंतेबोबलाद)हिला पोलीसांनी अटक केली आहे. ललितांने शहानूरचा खून केल्याची कबूली पोलीसांना दिली आहे.कोतेंबोबलाद येथे शहानूर यांचे विजापूर रोडला सायकल दुरूस्तीचे दुकान आहे.तर ललिता ह्या विवाहित महिलेचे जत रोडला छोटे किराणा दुकान आहे.ललीताच्या पतीचे निधन झाले आहे.ललीता एकटीच राहते.गेल्या आठवड्यापासून शहानूर ललिता हिला माझ्याशी शरीर संबध ठेव असे म्हणत होता.तिला ते पंसत नव्हते.गुरूवारी मध्यरात्री उशिराने शहानूर ललिताच्या घराकडे आला.व तिला शरीर संबंध ठेव म्हणू लागला.त्यातून चिडलेल्या ललिता हिने शहानूरचा गळा आवळून खून केला.खून केल्यानंतर त्यातून वाचावे म्हणून शहानूरचा मृत्तदेह दुकानासमोर टाकत ह्रदयविकाराचा झटका येऊन शहानूर मयत झाल्याचा बनाव केला.मात्र पोलीसांनी ललीताला खाक्या दाखवताच तिने खूनाची कबूली दिली आहे.दरम्यान ललिता ही एकटी असे कृत्य करू शकत यापाठीमागे अन्य कोणीतरी आहे.त्यांचा तपास व्हावा असे शहानूरच्या वडीलाचे म्हणणे आहे.तसा तपास पोलीसाकडून सुरू आहे.ललीताला न्यायालयात हजर केले असता,तिला पोलीस कस्टडी न्यायालयाने सुनावली आहे.ललीतासोबत अन्य कोण यात सामील आहे का?अशा पध्दतीने पोलीसाचा तपास सुरू आहे. ललिताच्या मोबाईल वरही पोलीसांचे लक्ष आहे.





