

आंवढी,वार्ताहर:आंवढी(ता.जत)येथील दारूबंदी केलेल्या महिलांचा सोनंद ता.सांगोला येथे अँड.समाधान काशीद यांचे वडील स्व.बाबासाहेब काशीद यांच्या पुण्यस्मरणानिमित्त भव्य सत्कार करण्यात आला.या महिलांनी सहा महिने संघर्ष करत दारुमुळे घरे कशी उद्ध्वस्त होतात हे घरोघरी जात पटवून देत आंवढी सारख्या मोठ्या गावात दारूबंदी करण्याचे काम केले आहे.त्यांचा गौरव अँड. समाधान शिंदे यांनी सोनंद येथे केला.आदर्श निर्माण केलेले आंवढी हे महाराष्ट्रातील सातवे गाव आहे.दारूबंदीचे शिवधनुष्य उचललेल्या या रणरागिणीचा साडी,फेटा, श्रीफळ,पुष्पगुच्छ देऊन माजी ग्रामपंचायत सदस्य निलावती काशीद,शालन भोसले,जयश्री काशीद यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच यासर्व प्रक्रियेत महत्त्वपूर्ण भूमिका बजावणारे सरपंच अण्णासाहेब कोडग यांचा सोलापूर जिल्हा कॉंग्रेसचे उपाध्यक्ष ज्ञानेश्वर कोळसे पाटील यांच्या हस्ते, उपसरपंच अाण्णासाहेब बाबर यांचा सत्कार सोनंचे संरपच समाधान पाटील,पोलीस पाटील डॉ.आण्णासाहेब कोडक यांचा माजी सरपंच मुरलीधर काशीद यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.यावेळी अँड.बंडू काशीद,रुपेश शिंदे,मयुर मोरे,प्रकाश काशीद,मुकेश काशीद,डॉ.महादेव गायकवाड,केशव बाबर आदी मान्यवर उपस्थित होते.