कोतेंबोबलाद | मध्ये तरूणाचा संशास्पद मृत्तदेह आढळला |

0
3

संख,वार्ताहर: कोंतेबोबलाद(ता.जत) येथे सायकल दुरुस्ती दुकानदार शहानूर खाजासाब मकानदार(वय -25,रा.कोतेंबोबलाद)यांचा गावातील ललिता मारूती मंचद यांच्या घरासमोर संशयास्पद मुत्यु झाल्याची घटना गुरूवारी मध्यरांत्री समोर आली.दरम्यान या प्रकाराने परिसरात खळबंळ उडाली आहे.याबाबत उमदी पोलीसात मयताचे वडील खाजासाब मकानदार यांनी फिर्याद दिली आहे.दरम्यान मुलांचा घातपात झाला असल्याची तक्रार त्यांनी पोलीसाकडे केली आहे.

घटनास्थंळ व पोलीसाकडून मिळालेली माहिती अशी,कोंतेबाबलाद येथे मयत शाहनूर यांचे विजापूर रोडवरील प्राथमिक आरोग्य केंद्रानजिक सायकल दुरूस्तीचे दुकान आहे.तो गावात राहतो. गुरूवारी रात्री तो बाहेर जाऊन येतो म्हणून घरातून गेला होता.स्टँड चौकातील सीसीटिव्हीत तो दहाच्या दरम्यान जत रोडला गेल्याचे दिसते आहे.जत रोडला राहणाऱ्या ललिता मंचद यांच्या दुकान वजा घरासमोर शाहनूर गुटखा खाल्यानंतर जमीनीवर कोसळल्याची माहिती ललिता यांनी शाहनूर यांच्या घरी जाऊन दिली.वडील व आईने ललिताचे घर गाठले असता शहानूर मयत झाल्याचे स्पष्ट झाले.तर त्याची दुचाकी जिल्हा परिषद शाळेजवळ सापडली आढळून आली.दरम्यान वडीलांनी समाजातील काही लोकांना सांची माहिती दिली.त्यांनतर हा प्रकार समोर आला. माझ्या मुलांचा खून झाला असल्याचे मयताचे वडील खाजासाब यांचे म्हणणे आहे.पोलीसांनी तातडीने घटनास्थंळी पोहचत पंचनामा केला आहे. घटना संशास्पद असल्याने डिवायएसपी अनिकेत भारती यांनी घटनास्थंळी भेट देऊन पोलीसांना तपासाच्या सुचना दिल्या आहेत.दरम्यान काही संशास्पद असल्याने काहीजणांना पोलीसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.अधिक तपास सा.पोलीस निरिक्षक प्रविण संपागे करत आहेत.

शहानूर यांच्या पश्चात आई,वडील,दोन विवाहित बहिणी,एक लहान भाऊ असा परिवार आहे.शहानूर हाच मकानदार कुटुबांचा कर्ता होता.त्यांच्या मुत्यूने त्यांच्या कुंटूबियांवर मोठे दु:ख कोसळले आहे.

Attachments area

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here