डफळापूर तलावात पाणी सोडण्याच्या काळात कँनॉलमध्ये उपसाबंदी

0
5

डफळापूर,वार्ताहर : डफळापूर तलावात आज ता.19 पासून सोडण्यात येत आहे.त्यामुळे डोर्ली,अंकले,बाज,बेंळूखी ते डफळापूर पर्यतच्या कँनॉलवर्ती अनधिकृतपणे कालवा फोडणे व पंप,मोटारीद्वारे पाणी उपसास बंदी घालण्यात आली आहे.तरीही नियम तोडून असे करणाऱ्या शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची कारवाई करावी असे आदेश म्हैशाळ पंपगृह विभागचे कार्यकारी अभिंयत्यांनी पोलीसांना दिले आहेत.तसे पत्र त्यांनी जत पोलीसांना दिले आहे.डफळापूर तलावासाठी 19 जानेवारी पासून आवर्तनाचे नियोजन आहे.ता.19 पासून 30 जानेवारी पर्यत उपसाबंदी करण्यात आली आहे. यापुर्वी असे पाणी उपसा करणाऱ्या शेतकऱ्यांना अधिकाऱ्यांनी मज्जाव केला असता दमदाटी,अंगावर धावून जाण्याचे प्रकार घडले आहेत.त्यामुळे कायदा सुव्यवस्था सुरळीत राहण्यासाठी पोलीस बंदोबस्ताची मागणी केली आहे.

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here