संख येथे रविवारी पासून चारा छावणी सुरू होणार : तुकाराम महाराज

0
9

जत,प्रतिनिधी : जत तालुक्यातील तीव्र दुष्काळाच़्या पार्श्वभुमीवर जिल्ह्यातील पहिली चारा छावणी चिक्कलगी मठाचे मठाधिपती तुकाराम महाराज यांच्या पुढाकारातून मोफत संख येथे रवीवार ता.20 पासून सुरू होणार आहे.तालुक्यातील शेतकरी दुष्काळाने हैराण झाला आहे. पिके न आल्याने चाऱ्याअभावी पशुधन संकटात आले आहे.अशा परिस्थितीत शासनाच्या सुविधाची वाट न बघता दानसुराच्या देणगीतून जनावरांसाठी मोफत चारा छावणी सुरू करत आहोत.या छावणीचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन 

तपोवन चिकलगी भुयार मठाचे मठाधिपती तुकाराम बाबा महाराज यांनी संख ता.जत येथील पत्रकार परिषदेत केले.यावेळी लकडेवाडीचे सरपंच राजू लकडे,मानवधिकार संघटनेचे अध्यक्ष संजय धुमाळ,चनाप्पा आवटी,सिद्राया मोरे आदी उपस्थित होते.

तुकाराम महाराज म्हणाले,शासनाच्या मदतीची कोणतेही अपेक्षा न करता या चाराछावणीत जनावरांना ओला,सुका चारा तसेच गोळी पेड देण्यात येणार आहे.जनावरांना निवाराची सोय केलेली आहे.सोबत असणाऱ्या शेतकऱ्यांना जेवण,व राहण्याची सुविधा उपलब्ध केली आहे.दुष्काळास सामोरे जाण्यास समाजातील दानशूर व्यक्तींनी या छावणीसाठी पुढाकार घेण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

जिल्ह्यात पहिली छावणी

तालुक्यातील दुष्काळाची विदारक परिस्थितीचे भान ठेवून स्वतःमोफत चारा छावणी काढण्याचा निर्णय तुकाराम महाराजानी घेतला आहे.शासनाच्या मदतीची कोणतीही अपेक्षा न करता चारा छावणी सुरु करण्याचा निर्णय घेऊन शासनाच्या डोळ्यात अंजन घातले आहे.या उपक्रमाचे जनसामान्यातून स्वागत होत आहे.

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here