

माडग्याळ,वार्ताहर : माडग्याळ ता.जत येथे संत अप्पर तहसील कार्यालयामार्फत महाराजस्व अभियान अंतर्गत समाधान मेळावा संपन्न झाला.427 प्रकरणाचा या मेळाव्यात निपटारा करण्यात आला. येथील न्यू इंग्लिश स्कूलच्या मैदानात मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. मिळाला मोठा प्रतिसाद मिळाला.प्रांताधिकारी,अप्पर तहसीलदार,मंडळ अधिकारी, तलाठी,ग्रामसेवक,कृषी,पशुवैद्यकीय,परिवहन,पोलीस,बाँकांचे स्टॉल उभारण्यात आले होते.यावेळी सर्व खात्याचे अधिकारी उपस्थित असल्याने दिवसभर परिसरातील नागरिकांच्या कामाचा निपटारा झाला. अनेक नागरिकांना तात्काळ दाखले,रेशनकार्ड,अशी विविध कागदपत्रे देण्यात आली.नवीन रेशन कार्ड, विभक्त रेशनकार्ड,नावे कमी करणे,वाढवणे,सातबारा दुरुस्ती,नोंदी,जातीचे दाखले, प्रधानमंत्री,सुकन्या,जीवन अटल पेन्शन,सुरक्षा विमा, समृद्धी योजनाची कागदपत्राची पुर्तता व माहिती देण्यात आली. दिवसभर चाललेल्या या मेळाव्यात 427 कामे पूर्ण करण्यात आली.सर्व विभागाने अंग झाडून नागरिकांची तात्काळ कामे केल्याने खरचं नागरिकांतून समाधान व्यक्त होत होते. या मेळाव्याचे उद्घाटन आमदार विलास जगताप यांच्या हस्ते झाले,प्रांताधिकारी तुषार ठोंबरे,नायब तहसीलदार अर्चना पाटील,मंडल अधिकारी नंदकुमार भुकटे,माडग्याळचे संरपच अप्पू जत्ती, सर्व विभागाचे अधिकारी कर्मचारी सरपंच पदाधिकारी उपस्थित होते.
माडग्याळ ता.जत येथील समाधान मेळाव्यात लाभार्थीस दाखल्याचे वाटप करताना आ.विलासराव जगताप,प्रांत तुषार ठोंबरे, अर्चना पाटील आदी