जत | सचिन मदनेचे उपोषण आश्वासनानंतर मागे |

0
3

जत

,प्रतिनिधी : जत तालुक्यातील दुष्काळी सुविधा तातडीने देण्याच्या मागणीसाठी गेल्या तीन दिवसापासून आमरण उपोषण बसेलेले सचिन मदने यांनी तहसीलदार सचिन पाटील यांनी दिलेल्या आश्वासनानंतर उपोषण मागे घेतले.तालुक्यात गंभीर दुष्काळ आहे.मागेल तेथे टँकर व चारा छावणीसह दुष्काळी सुविधा सुरू कराव्यात अशी मागणी मदने यांची होती.अंदोलनाला राष्ट्रवादीचे नेते सुरेश शिंदे,कॉंग्रेस नेते विक्रम सांवत,माजी सभापती मन्सूर खतीबसह विविध नेत्यांनी भेट घेऊन पांठिबा दिला.त्याशिवाय अनेक संघटनांनी पांठिबा दिला.दरम्यान बुधवारी सायकांळी तहसीलदार पाटील यांनी उपोषण कर्त्याची भेट घेत मागणी असलेले टँकर तातडीने सुरू करण्यात येतील,चारा छावणीचीतुर्त मागणी नाही,मात्र मागणी येताचछावणी सुरू करण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्याकडे प्रस्ताव पाठवू असे आश्वासन दिल्याने उपोषण मागे घेण्यात आले.

जत बुधवारी मदने यांना राष्ट्रवादी कॉग्रेसचे नेते सुरेश शिंदे,मन्सूर खतीब,उत्तम चव्हाण यांनी तर तत्पुर्वी कॉंग्रेस नेते विक्रम सांवत, बाबासाहेब कोडक,रविंद्र सांवत,युवक अध्यक्ष विकास माने, गणी मुल्ला यांनी पांठिबा दिला.

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here