निवडणूक प्रक्रियेसंबधी सर्व माहिती मिळणार आता 1950 टोल फ्री क्रमांकावर

0
3

– जिल्हाधिकारी वि. ना. काळम

नागरिक व मतदारांना
लाभ घेण्याचे आवाहन

   

    सांगली: निवडणूक संदर्भातील कोणत्याही माहितीसाठी, चौकशीसाठी
अथवा समस्येचे निरसन आता निवडणूक शाखेमध्ये सुरू करण्यात आलेल्या 1950 या टोल फ्री
क्रमांकावर एका कॉलव्दारे होणार आहे. निवडणूक प्रक्रियेबाबतची इत्यंभूत माहिती 1950
या टोल फ्री क्रमांकावर कॉल केल्याने आता मिळणार आहे. ही सुविधा बीएसएनएलच्या लँडलाईनवरून
बीएसएनएल मोबाईल वरून उपलब्ध करून देण्यात आली आहे. याचा जनता व मतदारांनी मोठ्या प्रमाणावर
लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी वि. ना. काळम यांनी केले आहे. यावेळी त्यांनी 1950
या टोल फ्री दूरध्वनी क्रमांकावर फोन करून या सेवेचे उद्घाटन केले व आवश्यक सूचना दिल्या.

    आगामी
लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या पूर्व तयारीचा एक भाग म्हणून जनता व मतदारांच्या सोयीसाठी
निवडणूक प्रक्रियेबाबत सर्व प्रकारची माहिती त्यांना उपलब्ध व्हावी यासाठी जिल्हाधिकारी
कार्यालयातील निवडणूक शाखेत 1950 हा टोल फ्री दूरध्वनी क्रमांक कार्यान्वीत करण्यात
आला आहे. नागरिक, मतदार त्यांचे नाव मतदार यादीत आहे का, मतदार यादीत नाव नोंदणी, वगळणी,
नावातील बदल किंवा इतर प्रकारच्या माहितीबाबत 1950 या टोल फ्री दूरध्वनी क्रमांकावर
कार्यालयीन वेळेत शासकीय सुट्टीचा दिवस वगळून संपर्क साधू शकता. तसेच निवडणूक प्रक्रियेबाबत
देखील व अनुषंगीक महत्त्वाच्या बाबींबाबतही माहिती घेवू शकतात. या क्रमांकावरून ईव्हीएम,
व्हीव्हीपॅट या मशिनबाबतही माहिती उपलब्ध होईल. एकूणच मतदारांना निवडणुकीच्या अनुषंगाने
1950 या टोल फ्री क्रमांकावरून सर्व माहिती उपलब्ध होईल.

    निवडणूक
विषयक घटनात्मक जबाबदारी पार पाडण्यासाठी 25 जानेवारी 1950 रोजी केंद्रीय निवडणूक आयोगाची
स्थापना करण्यात आली होती. आयोगाचे स्थापना वर्ष लक्षात घेवूनच 1950 हा क्रमांक निवडला
असण्याची शक्यता असलेबाबत माहिती निवडणूक शाखेतून देण्यात आली.

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here