जत | प्रशासनाने पाण्यासाठी भीक मागण्याची वेळ आणली ; विक्रम सांवत यांचा घणाघात |

0
2

प्रशासन,सत्ताधारी आमदार निष्क्रिय 

जत,प्रतिनिधी : जत तालुक्यातील सुमारे 44 गावात पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई आहे. गावेच्या गावे स्थलांतरित होण्याची भीती आहे. मात्र प्रशासकीय दिरंगाईमुळे पाण्याचा प्रश्न वेळेत सोडवण्यात अपयश येत असून सत्ताधारी आमदार जबाबदारी झटकत आहेत.जनावराचा चारा व पाण्यासाठी प्रशासनाने भीक मागण्याची वेळ आणली आहे. सरकारने आमच्या लोकांचा जीव वाचवावा,असा घणाघाती आरोप कॉंग्रेस नेते विक्रम सांवत यांनी केला. जत भागातील पाणीटंचाईच्या परिस्थितीवर आणि समस्या निवारणातील दप्तरदिरंगाईवर प्रहार केले. तात्पुरत्या पाणीपुरवठा योजनांबाबत प्राताधिकाऱ्यांचे अधिकार वाढवा.जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत जाण्याची वेळ आणू नका, दुष्काळनिवारणाच्या कामात चुकारपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाईचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना द्यावेत.जत तालुक्यात यंदा भिषण दुष्काळ पडला आहे.पश्चिम भाग वगळता तालुक्यात पिण्याच्या पाण्यासाठी टाहो फोडला जात आहे. पिके आली नसल्याने जनावरांची उपासमार शेतकऱ्यांचे हाल करत आहेत. दुसरीकडे सत्ताधारी आमदार टंचाई आढावा घेऊन प्रश्न विचारणाऱ्यांच्या आवाज दाबत त्यांच्या जखमेवर मीठ चोळत आहेत.जनतेला आपल्या वरील अन्याय सांगायलाही आता जागा राहिलेली नाही.  प्रशासनही आम्हाला अधिकारी नाहीत म्हणून हात वरर्ती करत आहेत.त्यामुळे नेमका न्याय कुणाकडे मागायचा असा प्रश्न जनतेसमोर पडला आहे. दुष्काळावर मात करण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा हेच माध्यम आहे. मात्र अनेक ठिकाणी ग्रामसेवकांपासून ते प्रशासनातील अधिकारी नेमल्या ठिकाणी जात नाहीत.पिण्याच्या पाण्यावाचून गावे स्थलांतरित होण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे, तर अनेक गावांत पिण्याचे पाणी विकत घ्यावे लागत आहे.बोटावर मोजण्याऐवढे टँकर सुरू केलेत.44 गावे सध्या टँकरच्या प्रतिक्षेत आहे.जनतेला पिण्याचे पाणी मिळविण्यासाठी रानोमाळ फिरण्याची वेळ तालुका प्रशासनाने आणली आहे.अशा कठीण काळात सरकारने पाण्याचा प्रश्न सोडवावा, असे सांवत म्हणाले.

सत्ताधारी पक्षात तीन गट पडले आहेत.ते कर्नाटकातून पाणी आणण्यासाठी राज्यपाल,मुख्यमंत्री, मंञ्याच्या भेटी घेऊन स्वत:च स्व ता:ची पाठ थोपटत आहेत.प्रत्यक्षात दुष्काळाचे त्यांना काहीही घेणे-देणे नाही.सध्या जानेवारी महिना सुरू आहे. जून पर्यंत परिस्थिती हतबल प्रशासन कसे हाताळणार असा सवाल त्यांनी उपस्थित केला.तातडीने उपाय योजना कराव्यात अन्यथा कॉंग्रेस रस्त्यावर उतरेल असे सांवत शेवटी म्हणाले.

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here