जत,प्रतिनिधी : महाराष्ट्र शासनाने जत तालुका दुष्काळ जाहीर करून दोन महिने उलटले तरी अद्यापही तालुक्याला कोणत्याही सुविधा दिलेल्या नाहीत.तालुक्यातील भीषण दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे भटक्या विमुक्त संघटनेचे तालुकाध्यक्ष सचिन मदने यांनी तहसील कार्यालयासमोर दुष्काळी सुविधा तातडीने द्याव्यात या मागण्यासाठी सोमवारपासून बेमुदत उपोषण सुरू केले.जत तालुक्यात सध्या भीषण दुष्काळ आहे.पाणी चारा यासाठी जनतेचे हाल सुरू आहे.शासनाने गंभीर दुष्काळ जाहीर करून गेल्या दोन महिन्यांपासून अपेक्षित सुविधा दिल्या नाहीत.अनेक गावांना टँकर प्रस्ताव देऊनही टँकर मिळत नाही.परिणामी पाणीटंचाईच्या झळाने जनता वैतागली आहे. पाणी मिळण्यासाठी जीव देण्याची वेळ आली. जत तालुक्यातील प्रशासनाने नागरिकांसमोर आणले आहे.त्यांना जाग यावी यासाठी कार्यकर्त्यांसह आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे.असे सचिन मदने यांनी सांगितले.जोपर्यत प्रशासन कारवाई करत नाहीतोपर्यत उपोषण सोडणार नसल्याचे मद ने म्हणाले.त्यांच्यासोबत प्रथमेश पवार,संतोष कुलाळ,साहिल बिराजदार,रेहमान उमराणी, रोहित चव्हाण,प्रशांत वाघमोडे आदी सहभागी झालेत. उपोषणाला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुरेश शिंदे,तालुकाअध्यक्ष उत्तमशेठ चव्हाण , माजी नगराध्यक्ष इकबाल गवंडी,माजी उपसभापती शिवाजी शिंदे,संरपच परिषदेचे तालुकाध्यक्ष बसवराज पाटील, कृष्णदेव गायकवाड,अशोक कोळी,पवन कोळी, मंजुनाथ कोळी, हेमंत खाडे आदींनी पाठींबा दिला.
जत : दुष्काळी सुविधा तातडीने द्याव्यात या मागणीसाठी सचिन मदने बेमुदत उपोषणास बसले आहेत.





