गुगवाड,वार्ताहर : बिंळूर ता.जत येथील दोन दुकाने फोडून चोरट्याने सुमारे 52 हाजाराचा मुद्देमाल लंपास केला.बिंळूर येथील मुख्य चौकातील अर्जुन शिवाप्पा दोडमाळ यांच्या मालकीचे अंबाभवानी कलेक्शन या कापड दुकानाचे शटर लोंखडी रॉडने उचकटून कांऊटरमधील 23 हाजार रोख व काही कपडे चोरट्याने पळविले.त्याचबरोबर लगत असणारे भैराप्पा भिमू माळी डफळापूरकर यांचे किराणा दुकानातील रोख रक्कम किराणा साहित्य असा 30 हाजाराचा मुद्देमाल लंपास केला. याबाबतची तक्रार पोलीसात रात्रीउशिरापर्यत दाखल नव्हती.दरम्यान तालुक्यात चोरटे पुन्हा सक्रीय झाल्याचे समोर येत आहे.उमदी नंतर बिंळूरमधील चोरीने पुन्हा चोऱ्यांचे सत्र सुरू झाले आहे.पोलीसांनी सतर्क होण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.





