पुर्व भागातील 42 गावांच्या पाणीप्रश्नी आ.जगताप मुख्यमंञ्यांना भेटले

0
4

कर्नाटकातील योजना पुर्ण करण्याची मागणी : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सकारात्मक

जत,प्रतिनिधी : जत तालुक्यातील पुर्व भागातील सिंचनापासून वंचित गावांना कर्नाटकातील योजनेतून पाणी सोडावे या मागणीचे निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जतचे आमदार विलासराव जगताप यांनी दिले.संध्या तीव्र दुष्काळात योजनेचे महत्व मुख्यमंत्री फडणवीस यांना आ.जगताप यांनी समजावून सांगितले.दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सकारात्मक असून या आंतरराज्यीय योजनेचा प्रश्न लवकरचं मार्गी लावू असे सांगितल्याचे आ.जगताप यांनी सांगितले. यावेळी सांगलीचे आ.सुधीर गाडगीळ उपस्थित होते.कर्नाटकातील यत्नाळ बंधार्‍यामध्ये पाणी आले आहे.तेथुन नैसर्गिक प्रवाहाने जत पूर्वभागासाठी गावांना पाणी सोडणे शक्य आहे.वर्षानुवर्षे महाराष्ट्र राज्यातून कर्नाटकला पाणी सोडले जाते.यावर्षी दोन्ही राज्यात दुष्काळ आहे.कर्नाटकला पाणी सोडण्यापूर्वी,कर्नाटकने जत तालुक्याला यत्नाळ बंधार्‍यातून 1 टीएमसी पाणी सोडावे या चर्चेसाठी दोन्ही राज्यातील संबंधित अधिकार्‍यांची व मंत्र्यांची बैठक आयोजित करावी व जत तालुक्याच्या पाण्यापासून वंचित असलेल्या 42 गावाचा पाण्याचा प्रश्न मिटवावा या आशयाचे पत्र मुख्यमंत्र्याना आ.जगताप यांनी दिले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यत्नाळ योजनेचा गंभीरपणे विचार करून हे काम लवकरात लवकर मार्गी लावण्याचे आश्वासन आ.जगताप यांना दिले आहे.

कॉग्रेसची तुबची-बबलेश्वर गाजर योजना : भाजपा नेत्याचा आरोपतुबची बबलेश्वर ही गाजर योजना जत पूर्वभागासाठी व्यवहारिकदृष्ट्या अशक्य आहे.कारण काॅंग्रेस शासनाच्या कालावधीत जेव्हा या योजनेचे काम चालू झाले.तेव्हा महाराष्ट्र शासनाला त्या योजनेतील रकमेच्या  40% वाटा घेण्यास कर्नाटक शासनाचा आग्रह होता.ती अट काॅंग्रेस शासनाकडून पूर्ण झाली नाही.विजापूरचे पाणीदार मंत्री एम.बी.पाटील यांनी फक्त कर्नाटक शासनाच्या निधीवर तुबचीपर्यंत पाणी आणले आहे.आता त्यांचे काम पूर्ण झाले आहे.पाणी तुबची येथे आले आहे.आणि आपल्या जतमधील आमदारकीचे डोहाळे लागलेल्या काही नेत्यांना फुकटचे पाणी 42 गावाना पुरविण्याचे खुळे नाद लागलेले आहेत. पण ते तांत्रिकदृष्ट्या शक्य नाही.असा आरोप भाजपचे नेते सुनिल पवार यांनी केले आहेत.त्यांनी तुबची-बबलेश्वर योजनेबाबत काही स्पष्ट मते सोशल मिडीयातून व्यक्त केली आहेत.ती अशी,सामाईक मोटरीचे सख्ख्या भावाच्या वाटणीला येणारे निम्मे लाईटबिल (जास्तीत जास्त 1500 रूपये)भरले नाही. म्हणून आपण स्वतःच्या सख्या भावाला बटणाला हात लावू देत नाही.मग कर्नाटक शासनाने पाचशे कोटी रूपये खर्चून केलेल्या तुबची बबलेश्वर योजनेमध्ये जतला आता फुकटात का सामावून घ्यावे ? तर तुबची बबलेश्वर ही योजना म्हणजे गरीब जनतेला दाखविलेले एक गाजर आहे.42 गावच्या पाण्याचा प्रश्न हा फक्त यत्नाळ योजनेतूनच सुटणार आहे.हे आ.जगताप यांच्या चाणाक्ष बुद्धीने हेरलेले आहे.  सांगली जिल्ह्याचे खा.संजयकाका पाटील व आ. जगताप ही जोडी निश्चीतपणे यत्नाळ योजनेसाठी शासनदरबारी पाठपुरावा करून 42 गावचा पाण्याचा प्रश्न कायमचा निकाली काढतील यात मला तिळमात्रही शंका वाटत नाही.सर्वांनी त्याला साथ द्यावी असे आवाहनही सुनिल पवार यांनी केले आहे.

 जत पुर्व भागातील 42 गावांच्या पाणीप्रश्नी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मागणीचे पत्र देताना आ.विलासराव जगताप,सुधीर गाडगीळ आदी

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here